
MIDC Police Station : नगर : शहरालगतच्या नवनागापूर (Navanagapur) परिसरातील बंद पडलेल्या कचरा डेपोमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर (Raid on Gambling Den) एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police Station) छापा टाकून ११ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण ३ लाख ७२ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नक्की वाचा: हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या महंतांबद्दलचे शब्दप्रयोग निषेधार्ह : डॉ राधाकृष्ण विखे पाटील
बंद पडलेल्या कचरा डेपोमध्ये जुगार
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गुप्त माहितीदारामार्फत साईराज नगर, नवनागापूर येथील बंद पडलेल्या कचरा डेपोमध्ये काही जण तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पथकासह घटनास्थळी धाड टाकली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यांना पकडले (MIDC Police Station)
डेपो परिसरातील मोकळ्या जागेत लाईटच्या उजेडात काही जण पैसे लावून जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी छापा टाकत संबंधितांना ताब्यात घेतले. यावेळी सुंदर ऊर्फ विकास विजय खंडागळे, शुभम नरेंद्र दायमा, प्रदीप भाऊसाहेब कोहक, सोफियान रौफ कुरेशी, अमन हमीद शेख, सुरेश शिवराम नन्नवरे, इब्राहीम इक्बाल बेग, योगेश तानाजी घोरपडे, दत्तात्रय शंकर येवले, किशोर कचरू शिंदे आणि किरण प्रभाकर पानपाटील यांना पकडण्यात आले. तर निलेश भाकरे हा संशयित घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कारवाईदरम्यान जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य, रोख रक्कम आणि अन्य मुद्देमाल असा एकूण ३ लाख ७२ हजार ६३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, सहाय्यक फौजदार फकीर शेख, शिंदे, पोलीस अमलदार राजेंद्र सुद्रीक, पितळे, आढाव, किशोर जाधव, सचिन हरदास, सुरज देशमुख, अक्षय रोहोकले, शेरकर यांच्या पथकाने केली.


