Fake Shampoo : बनावट ब्रँडेड शॅम्पू विक्री करणारी टोळी जेरबंद;एमआयडीसी पोलिसांची नागापूर आठवडे बाजारात कारवाई

Fake Shampoo : बनावट ब्रँडेड शॅम्पू विक्री करणारी टोळी जेरबंद;एमआयडीसी पोलिसांची नागापूर आठवडे बाजारात कारवाई

0
Fake Shampoo : बनावट ब्रँडेड शॅम्पू विक्री करणारी टोळी जेरबंद;एमआयडीसी पोलिसांची नागापूर आठवडे बाजारात कारवाई
Fake Shampoo : बनावट ब्रँडेड शॅम्पू विक्री करणारी टोळी जेरबंद;एमआयडीसी पोलिसांची नागापूर आठवडे बाजारात कारवाई

Fake Shampoo : नगर : नामांकित कंपन्यांच्या शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये अज्ञात केमिकल मिश्रण (Unknown Chemical Mixture) भरून ते अस्सल ब्रँडेड शॅम्पू असल्याचा बनाव करत (Fake Shampoo) आठवडे बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police Station) पर्दाफाश केला. या कारवाईत एक लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नक्की वाचा: हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या महंतांबद्दलचे शब्दप्रयोग निषेधार्ह : डॉ राधाकृष्ण विखे पाटील

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे

शानमोहम्मद पप्पूखान आलबी (वय २५, रा.इस्लामनगर, ता. सादाबाद, जि. हाथरस, राज्य उत्तरप्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे साथीदार रब्बानी रज्जाक अब्बास व फैजान अहमद अली खान, दोघे रा. इस्लामनगर, ता. सादाबाद, जि हाथरस, राज्य उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

बनावट शॅम्पू तयार करून विक्री करत असल्याचे उघड (Fake Shampoo)

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार नागापूर येथील आठवडे बाजारात सह्याद्री चौकात एक व्यक्ती विविध कंपन्यांचे शॅम्पू कमी दरात विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तो साथीदारांच्या मदतीने बनावट शॅम्पू तयार करून विविध बाजारांमध्ये विक्री करत असल्याचे उघड झाले.
या टोळीने नामांकित कंपन्यांच्या क्लिनीक प्लस, डव, हेड ॲण्ड शोल्डर्स आणि पॅन्टीन या ब्रँडच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर करून त्यामध्ये अज्ञात केमिकल मिश्रण भरत होती. हे शॅम्पू अस्सल असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणूक केली जात होती. संबंधित शॅम्पू मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकतात, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

पोलिसांनी कारवाईदरम्यान बनावट शॅम्पूच्या बाटल्या, पॅकिंग साहित्य, केमिकल व पावडर असा सुमारे १ लाख १८६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या प्रतिनिधीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणूक, कॉपीराइट आणि ट्रेडमार्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी, प्रभारी अधिकारी, एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे राकेश खेडकर, राजू सुद्रीक, पोलीस अंमलदार शैलेश रोहोकले, सचिन आडबल, किशोर जाधव, दिपक फुंदे, नवनाथ दहिफळे, राहुल गुंडु यांचे पथकाने केली आहे.