Habitual Offender Externed : सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार; कोतवाली पोलिसांच्या प्रस्तावावर कारवाई

Habitual Offender Externed : सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार; कोतवाली पोलिसांच्या प्रस्तावावर कारवाई

0

Habitual Offender Externed : नगर : अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या (Kotwali Police Station) हद्दीतील सराईत गुन्हेगार संग्राम रमेश गिते (रा. शंकर महाराज मठाजवळ, केडगाव) यास गंभीर गुन्हेगारी कृत्यांमुळे (Serious Criminal Act) दोन वर्षांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार (Habitual Offender Externed) करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी, नगर विभाग यांनी ही कारवाई केली आहे.

नक्की वाचा: दगडफेक करत वाहनाची तोडफोड; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मारहाण,चोरी, दहशत करणे असे अनेक गुन्हे

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्राम गिते याच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बळाचा वापर करणे, साथीदारांसह चाकूने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, नागरिकांना विटांनी मारहाण करणे, अंगावर दुचाकी घालून गंभीर जखमी करणे, जबरी चोरी, चोरी तसेच शासकीय आदेशाचा भंग करणे अशा स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत प्रस्ताव (Habitual Offender Externed)

या वाढत्या गुन्हेगारीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्याच्याविरोधात मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव कोतवाली पोलीस ठाण्याकडून करण्यात आला होता. हा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी, नगर विभाग यांच्याकडे पाठविण्यात आला होता. उपविभागीय दंडाधिकारी यांनी संबंधित प्रस्तावाची सखोल चौकशी करून उपलब्ध पुरावे, गुन्हेगारी पार्श्वभूमी व पोलीस अहवालांचा विचार करत संग्राम रमेश गिते यास दोन वर्षांच्या कालावधीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले.