Unidentified Body : आढळगाव परिसरात अज्ञात व्यक्तीचा आढळला मृतदेह; उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज

Unidentified Body : आढळगाव परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; उष्माघाताने मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज

0
Unidentified Body : आढळगाव परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; उष्माघाताने मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज
Unidentified Body : आढळगाव परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; उष्माघाताने मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज

Unidentified Body : श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरातील शेतात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (Unidentified Body) काल (दि. १३ मे) मिळून आला आहे. सदर व्यक्तीचा मृत्यू उष्माघातामुळे (Death Due to Heatstroke) झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून (Police) वर्तवण्यात येत आहे.

नक्की वाचा: दगडफेक करत वाहनाची तोडफोड; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शेतकऱ्याच्या शेतात आढळला मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आढळगाव परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतात हा मृतदेह आढळून आला. मृतदेह दोन दिवसांपूर्वीचा असावा अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. सदर व्यक्ती कामगार मजूर वर्गातील असल्याची चर्चा असून, अद्याप त्याची ओळख पटू शकलेली नाही.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत केला पंचनामा (Unidentified Body)

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अधिक तपासासाठी मृतदेह अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले आहे.