
Encroachment : पाथर्डी : कुत्तरवाडी व चिंचपूर इजदे येथील फॉरेस्ट जमिनीवरील कथित अतिक्रमण (Encroachment) प्रकरणी संबंधित प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पाथर्डी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रवेशद्वारासमोर आंदोलन (movement) केले.अंबादास दादाबा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर (Tehsil Office) धडक देत घोषणाबाजी केली. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन देऊन फॉरेस्ट जमिनीवरील अतिक्रमण तत्काळ हटविण्याची मागणी केली.
नक्की वाचा : पाथर्डी पंचायत समितीमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीवरून जिल्हा परिषदेकडून चौकशी
वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर उपोषण
निवेदनात म्हटले आहे की,महसूल खात्याचे निवृत्त अधिकारी भुजंगराव नाथा दहिफळे यांनी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून फॉरेस्ट जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित जमिनीवर मोठ्या प्रमाणात फळझाडांची लागवड करून आर्थिक फायदा घेतला जात असल्याचेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.या प्रकरणी यापूर्वी ४ मार्च २०२६ ला वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी कारवाईचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. तसेच संबंधितांकडून धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मालमत्तेची तपासणी करण्याची मागणी (Encroachment)
फॉरेस्ट विभागातील अधिकारी तसेच महसूल कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून मालमत्तेची तपासणी करावी, अशी मागणीही करण्यात आली.फॉरेस्ट जमिनीवरील अतिक्रमण हटवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.अंबादास गायकवाड, एकनाथ शिंदे, लक्ष्मण खेडकर, अजिनाथ शिंदे, अमोल शिंदे, पूजा शिंदे, रमेश शिंदे यांच्यासह अनेक ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते.


