Glory: पाथर्डी: देशसेवेसाठी कार्य करणाऱ्या सैनिकांच्या प्रश्नांबाबत पाथर्डी नगरपरिषदेची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली असून माजी सैनिकांच्या त्रिदल संघटनेच्या कार्याला बळ देण्यासाठी शहरातील खुल्या जागेवर सभागृह व स्मारक उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू. यासाठी आमदार मोनिका राजळे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन पाथर्डी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी दिले. पाथर्डी नगरपरिषदेच्या सभागृहात माजी सैनिकांच्या त्रिदल संघटनेची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी सैनिक नितीन पालवे यांची केंद्र सरकारच्या रेल्वे सेवेत, तर संभाजी मरकड यांची राज्य पोलिस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव (Glory) करण्यात आला.
अवश्य वाचा- व्यापार्यांकडून बाळहिरड्याची कवडीमोल दराने खरेदी; आदिवासी शेतकऱ्यांची हमीभाव देण्याची मागणी
माजी सैनिकांच्या त्रिदल संघटनेची मासिक बैठक (Glory)
यावेळी त्रिदल संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन गर्जे, उपाध्यक्ष रोहिदास एडके, प्रभाकर फुंदे, विठ्ठल तांदळे, सचिन आमटे,संभाजी काकडे, सतीश काकडे, भीमराव रोकडे, रावसाहेब बडे, किशोर शिरसाट, आजिनाथ घुले, अण्णा घुले, रामनाथ भाबड, मधुकर चन्ने, भाऊसाहेब काळे, रमेश काळोखे, बाळासाहेब ससे, नामदेव वारे, नवनाथ नेहूल, सचिन शेळके, मच्छिंद्र राठोड, उद्धव दराडे, रामकृष्ण मिसाळ, अशोक मरकड आदी उपस्थित होते.



