Subsidies for Farmers | अहिल्यानगर जिल्ह्यातील २७ हजार ६०२ शेतकऱ्यांना ‘अवकाळी’चे अनुदान मंजूर

0

Subsidies for Farmers | नगर : मार्च २०२६ या कालावधीत विविध जिल्ह्यांत अवकाळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार १६४ कोटी ८३ लाख ४४ हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील २७ हजार ६०२ बाधित शेतकऱ्यांना २५ कोटी २० लाखांचा निधी मंजूर (Subsidies for Farmers) करण्यात आला आहे. या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना खरिपाच्या तोंडावर दिलासा मिळाला आहे.

हे वाचा – व्यापार्‍यांकडून बाळहिरड्याची कवडीमोल दराने खरेदी; आदिवासी शेतकऱ्यांची हमीभाव देण्याची मागणी

बँक खात्यात निधी वितरीत (Subsidies for Farmers)

डीबीटी पोर्टलव्दारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरीत करण्यात येणार आहे. चालू हंगामामध्ये यापूर्वी शेतीपिकांच्या नुकसानीकरीता वितरीत करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तांवातर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही.

नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप यांची सोशल मीडियावर बदनामी; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वादळी वाऱ्यामु‌ळे पिके (Subsidies for Farmers)

दरम्यान, मार्च २०२६ मध्ये राहुरी, नेवासा, राहाता, अकोले, नगर व पाथर्डी या सहा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला होता. त्यावेळी पारनेर, राहुरी, नेवासा या तालुक्यात गारपीट झाली होती. पुन्हा नगर, राहुरी, पारनेर, श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यात गारपीट झाली. या पावसामु‌ळे अनेक ठिकाणी रस्ते, अंगणे व शेतांमध्ये गारांचा सडा पडला. द्राक्ष, आंबा, डाळिंब, टरबूज या फळपिकांसह गहू, हरभरा आणि चारा यांसारख्या पिकांना मोठा फटका बसला. यावेळी वादळी वाऱ्यामु‌ळे पिके आडवी झाली. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अनेक ठिकाणी काढणीला आलेले गहू पीक जमीनदोस्त झाले. कापून ठेवलेला गहू भिजल्याने नुकसान वाढले असून चार पिक असणारी मका आडवी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कंबरडेच मोडले गेले होते. या नुकसानीपोटी सरकारने आता भरपाई जाहीर केली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here