Rahuri Police Station : धारदार शस्र व पिस्तूल घेऊन रील बनवणे पडले महागात; राहुरी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Rahuri Police Station : धारदार शस्र व पिस्तूल घेऊन रील बनवणे पडले महागात; राहुरी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

Rahuri Police Station : राहुरी : धारदार कत्ती व पिस्तुल (Pistol) सारखे वस्त्र जवळ बाळगून त्याचा रिल (Reel) करुन इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हायरल करण्यात आला. राहुरी पोलिस प्रशासनाने (Rahuri Police Station) रिल बनवणाऱ्या दोन जणांवर आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल केलाय. रिल बनवून व्हायरल केल्याची घटना चांगलीच अंगलट आली. या घटनेची तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

नक्की वाचा : पाथर्डीतील जुन्या पालिका इमारतीत चोरी; ४२ हजारांचा ऐवज लंपास

जनतेमध्ये भिती निर्माण करण्यासाठी रिल केल्याचे दिसून आले

राहुरी पोलिस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक गणेश वाघमारे यांना दि. १९ मे २०२६ रोजी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास गोपनीय बातमीदारा मार्फत व्हिडिओ प्राप्त झाला होता. त्यामध्ये एका इंस्टाग्राम आईडी वर राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील दोन तरुणा पैकी एकाच्या हातामध्ये कत्ती सारखे घातक व धारदार हत्यार घेवुन दहशत निर्माण करत आहे. तसेच दुसरा तरुण तरुणाच्या हातामध्ये पिस्तुल सारखे शस्त्र दिसत असुन दोघेही जनतेच्या मनामध्ये भिती निर्माण व्हावी म्हणुन त्यांनी सदरची रिल तयार केल्याचे दिसून आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल (Rahuri Police Station)

हवालदार रवि गोविंद पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत उर्फ चाचा रावसाहेब पडघलमल, रा. सात्रळ, ता. राहुरी, व एक अनोळखी इसम अशा दोन जणांवर आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढिल तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.