Rajnath Singh Inaugurates Defence Factory in Shirdi : संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत होणार संरक्षण उत्पादन संकुलाचे उद्घाटन; विखे यांची माहिती

शिर्डी येथील प्रकल्पात एक हाजार कोटी रुपयांची गुंतवणूक

0
Rajnath Singh Inaugurates Defence Factory in Shirdi : संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत होणार संरक्षण उत्पादन संकुलाचे उद्घाटन; विखे यांची माहिती
Rajnath Singh Inaugurates Defence Factory in Shirdi : संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत होणार संरक्षण उत्पादन संकुलाचे उद्घाटन; विखे यांची माहिती

Rajnath Singh Inaugurates Defence Factory in Shirdi : राहाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आत्मनिर्भर भारत आणि ‘मेक इन इंडीया’ या भारताच्या दूरदर्शी संकल्पनांना चालना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी औद्योगिक वसाहती मध्ये ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलाचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) यांच्या उपस्थितीत २३ मे रोजी होणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि निबे गृपचे गणेश निबे यांनी दिली.

नक्की वाचा : उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षकांच्या बदलीची मागणी; आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार

शिर्डी येथे डिफेन्स क्लस्टरचे निर्माण

शिर्डी औद्योगिक वसाहती मध्ये निबे गृपच्या माध्यमातून भारतातील खासगी क्षेत्रातील संरक्षण उत्पादनाच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की,अत्यावश्यक संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांसाठी प्रगत उत्पादन क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने शिर्डी येथे डिफेन्स क्लस्टरचे निर्माण होत आहे.शिर्डीची भूमी भक्ती आणि शक्तीचा अद्वितीय संगम आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

या प्रकल्पातून तीन हजार रोजगार निर्मिती (Rajnath Singh Inaugurates Defence Factory in Shirdi)

श्री साईबाबांचा श्रध्दा आणि सबुरीचा संदेश आणि दुसरीकडे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे स्पष्ट करून, कार्यान्वित होणाऱ्या प्रकल्पातून तीन हजार रोजगार निर्मिती होईल. यासाठी शिर्डीची निवड केल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

शिर्डी येथील प्रकल्पात एक हाजार कोटी रुपयांची गुंतवणूक

निबे उद्योग समुहाचे गणेश निबे प्रकल्पाची माहिती देताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून आमच्या स्टार्टअपला मिळालेली संधी खूप मोठी आहे. शिर्डी येथील प्रकल्पात एक हाजार कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आतापर्यंत केली आहे.भविष्यात ही गुंतवणूक अधिक वाढेल.अत्याधुनिक प्रणालींचे डिझाइन, विकास, उत्पादन आणि एकत्रीकरण करणारी भारतातील आघाडीचा निबे गृप असून,शिर्डी येथील प्रकल्पातील बाॅम्ब शेलच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमीपूजन संरक्षण मंत्री राजनाथसिंह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

लघु सूक्ष्म उद्योगाचे होणार सक्षमीकरण

शिर्डी येथील प्रकल्प राष्ट्रीय सुरक्षा अर्थिक विकास लघु सूक्ष्म उद्योगाचे सक्षमीकरण रोजगार निर्मिती आणि पर्यावरणीय जबाबदारी आशा एकात्मिक दृष्टिकोनातून कार्यान्वित होणार असून, प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमिताने देशभरातील विद्यार्थी, उदयोन्मुख अभियंता, लघु सूक्ष्म उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले उद्योजक यांना निमंत्रित करण्यात आले असल्याचे गणेश निबे यांनी सांगितले.