Pathardi News : पाथर्डीत केमिकल’युक्त’ फळ विक्रेत्यांवर प्रशासनाचा छापा; अनेकांनी दुकाने सोडून काढला पळ 

नमुन्यांचा सविस्तर तपासणी अहवाल लवकरात लवकर देण्याची विनंती

0
Pathardi News : पाथर्डीत केमिकल'युक्त' फळ विक्रेत्यांवर प्रशासनाचा छापा; अनेकांनी दुकाने सोडून काढला पळ 
Pathardi News : पाथर्डीत केमिकल'युक्त' फळ विक्रेत्यांवर प्रशासनाचा छापा; अनेकांनी दुकाने सोडून काढला पळ 

Pathardi News : पाथर्डी : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून रासायनिक (Chemical) पद्धतीने पिकवलेले आंबे आणि केळी मोठ्या प्रमाणावर विकली जात असल्याची चर्चा सुरू होती. नागरिकांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ थांबवण्यासाठी अखेर प्रशासनाने (Administration) गुरुवारी (ता. २१) सकाळी पोलीस बंदोबस्तात (Police Protection) मोठी कारवाई केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे आणि उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन दरंदले यांच्या संयुक्त पथकाने पाथर्डी शहरातील घाऊक आणि किरकोळ फळ विक्रेत्यांच्या वखारींवर व दुकानांवर अचानक छापे टाकले. 

नक्की वाचा : ज्ञानभारतम प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समन्वयाने कार्य करा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

केमिकलने पिकवलेल्या आंब्याचे कॅरेट लपवण्याचा प्रयत्न

या धडक कारवाईमुळे फळ बाजारात एकच खळबळ उडाली असून, अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सोडून पळ काढला, तर काहींनी केमिकलने पिकवलेल्या आंब्याचे कॅरेट लपवण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या पथकाने शहरातील प्रमुख ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. यामध्ये अजंठा चौक,नाईक चौक,कोरडगाव चौक, नाथनगर, एडके कॉलनी येथील फळांच्या मोठ्या वखारींवर आणि दुकानांवर ही कारवाई करण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांच्या दुकानातून आंबे व केळीचे नमुने तपासणीसाठी जप्त (Pathardi News)

या मोहिमेदरम्यान प्रशासनाने सारीका इधाते, नाथा माधव दहिफळे, संतोष पालवे, नदीन उस्मान सय्यद, इम्रान हासन बागबान, समीर रऊब बागबान, अब्दुल कलीम शेख, गहिनीनाथ घुले, अलियास हनिफ बागबान, जावेद बागबान, जावेद सरदान बागबान, जब्बर सत्तार बाबू, अयाज हनिफ बागबान, नबाबी बागबान, इस्ताक दिलावर बागवान आणि अरुणा दिनकर गव्हाणे यांच्या दुकानातून आंबे व केळीचे नमुने पुढील तपासणीसाठी जप्त केले आहेत.

तपासणी अहवाल लवकरात लवकर देण्याची विनंती

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी या जप्त केलेल्या फळांचे नमुने पुढील रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या संदर्भात त्यांनी अहिल्यानगर येथील अन्न व औषध प्रशासन (FDA) सहाय्यक आयुक्तांना अधिकृत पत्र लिहून या नमुन्यांचा सविस्तर तपासणी अहवाल लवकरात लवकर देण्याची विनंती केली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

जप्त केलेले नमुने पाठवले प्रयोगशाळेत

या धडक कारवाईत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. सचिन दरंदले यांच्यासह आरोग्य सेवक परमेश्वर बडे, एकनाथ पालवे, संतोष तेलंग, उत्तम गिरी आणि सचिन निकम आदी कर्मचारी सहभागी झाले होते. पाथर्डी शहरात गैरमार्गाने, केमिकलचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याच्या तक्रारी होत्या. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून आम्ही ही कारवाई केली असून, जप्त केलेले नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल येताच दोषींवर कठोर कारवाई होईल.