Robbery : श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील कोरके वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास तीन ते चार अज्ञात दरोडेखोरांनी (Robbery) सशस्त्र हल्ला चढवला. घरातील सदस्यांना जबर मारहाण (Assault) करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात (Belvandi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : शिरसाटवाडी सेवा सोसायटीचा शतकपूर्तीचा मानाचा टप्पा; ९५ वर्षांची बिनविरोध परंपरा कायम
दरोडेखोरांचा कुटुंबावर अचानक हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, ढवळगाव परिसरातील कोरके वस्तीवर गोरख गणपत कोरके (वय ५३, व्यवसाय-शेती) हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची मुलगी बाळंतपणासाठी सध्या माहेरी आली आहे. २३ मे रोजी रात्री तीव्र उकाडा आणि वीज नसल्यामुळे गोरख कोरके, त्यांचा मुलगा, पत्नी आणि आई हे घराबाहेरील पटांगणात झोपले होते, तर मुलगी लहान बाळासह घरात झोपली होती.
२४ मे रोजी मध्यरात्री साधारण १:३० वाजण्याच्या सुमारास गोरख कोरके यांना अचानक जाग आली. तेव्हा त्यांच्या पायाजवळ हातामध्ये लाकडी दांडके आणि लोखंडी रॉड घेतलेले दोन अज्ञात इसम उभे असलेले दिसले. कोरके यांनी आवाज देताच दरोडेखोरांनी त्यांच्यावर व कुटुंबावर हल्ला चढवला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कुटुंबाला गंभीर मारहाण (Robbery)
या झटापटीत गोरख कोरके यांच्या मुलाच्या डाव्या पायाला गंभीर मार लागला, तर मुलगी आणि पत्नी यांच्या हाता-पायाला दुखापत झाली. दरोडेखोरांनी गोरख यांच्या वृद्ध आईच्या डोक्यावर वार करत जखमी केले.
दरोडेखोरांनी गोरख कोरके यांच्या आई व पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर घरात घुसून कपाटातील ३४ हजार रुपयांची रोख रक्कम, १ लाख ४६ हजार रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने असा मुद्देमाल लंपास केले.
घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे अधिकारी नंदकुमार सोनवलकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.



