
Ahilyanagar : नगर : विचार भारती आयोजित ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन काल (ता.२४) वेदांतचार्य देविदास म्हस्के महाराज यांच्या हस्ते माऊली सभागृहात झाले. यावेळी आमदार संग्राम जगताप, विचार भारतीचे अध्यक्ष अरुणराव कुलकर्णी, ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र मुळे,सचिव सुधीर लांडगे, उद्योजक नंदन कामत, व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे वक्ते प्रसिद्ध लेखक अभिजित जोग आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. अहिल्यानगर गौरव गीताने कार्यक्रमास सुरवात झाली. व्याख्यानमालेचे हे १६ वे वर्ष आहे.
हेही वाचा : व्यवसायिकावर हल्ला करत हवेत गोळीबार; सावेडी उपनगरातील घटना
विचार भारतीचे काम नि:स्पृह
प्रास्ताविकात रवींद्र मुळे म्हणाले की, “थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली. जगामध्ये जे काही चांगलं घडवायचं असेल तर त्याची सुरवात तुमच्या गावापासून करावी लागते आणि त्यासाठी आत्मबोध जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत तुम्ही आत्मविस्मृतीतून बाहेर येत नाही. समाज परिवर्तनासाठी पूर्ण मानवजातीला चांगल्या विचारांची नितांत गरज आहे”. वेदांतचार्य देविदास म्हस्के म्हणले “चांगले विचार देण्याचे काम विचार भारती नि:स्पृहतेने करत आहे, या वैचारिक परिवर्ताच्या प्रयत्नांमुळे ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीगुरुकडे जे पसायदान मागितले ते प्रत्यक्षात येणे अपेक्षित आहे”.
नक्की पहा : प्रशिक्षणा दरम्यान हॅन्ड ग्रेनेड हातात फुटला; दोन पाेलीस कर्मचारी जखमी
यांची उपस्थिती (Ahilyanagar)
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते व केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी व संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती करण्यात आली. व्याख्यानमालेचे प्रमुख प्रशांत आढाव यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. राजेंद्र पाचे, राहुल गांधी, दिनेश अग्रवाल यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. डॉ.ऋषिकेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर श्रेयस लहामगे यांनी आभार मानले. यावेळी व्याख्यानमाला संयोजन समितीचे सदस्य राजेश झंवर, राजू लक्ष्मण, चंद्रकांत पंडित, मनोज झंवर, रवींद्र बारस्कर, श्रीगोपाल जाखोटीया, उदय भणगे. डॉ, विक्रम दीडवाणिया, अशोक सागडे, अमित खामकर, निनाद टिपुगडे, यश निंबाळकर, सुनील नागोरी, डॉ. नीलकंठ ठाकरे, राजेंद्र तागड, मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.


