Pune : पुण्यात उद्यापासून १४ दिवस जमावबंदी लागू; मोर्चे-सभांना बंदी, इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

0
Pune : पुण्यात उद्यापासून १४ दिवस जमावबंदी लागू; मोर्चे-सभांना बंदी, इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Pune : पुण्यात उद्यापासून १४ दिवस जमावबंदी लागू; मोर्चे-सभांना बंदी, इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Pune : नगर : पुण्यात उद्या रात्रीपासून (ता. 26) जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेने याबाबत परिपत्रक काढून 14 दिवस जमावबंदी लागू केली आहे. या जमावबंदीच्या काळात आंदोलनं, मोर्चे, सभांना बंदी असणार आहे.

हेही वाचा : ढवळगाव येथील कोरके वस्तीवर दरोडा; कुटुंबाला मारहाण करत १ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास

महापालिका कर्मचाऱ्यांना सूचना

पुणे महापालिकेच्या वाहनांसाठी होणारा वाढता इंधन खर्च आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या विविध विभागांकडून वाहनांचा होत असलेला अवाजवी वापर, अनावश्यक प्रवास वे आणि वाढता इंधन खर्च लक्षात घेता अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी सर्व विभागप्रमुखांना इंधन बचतीबाबत तातडीचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या वाहनांचा वापर अत्यावश्यक कामांसाठीच करावा, प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असंही अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर निर्देश दिले आहेत.

नक्की पहा : मुलांना मोबाईलशिवाय जेवायला कसं शिकवायचं? पाहा!

प्रतिबंधात्मक निर्णय (Pune)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम आशियाई संकटाच्या पाश्वभूमीवर देशातील नागरिकांना आवाहन केले आहे. देशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून आंदोलने, मोर्चे आणि निदर्शने सुरू आहेत. पुणे शहरातही आंदोलनांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे. या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असणार आहे.