Admission : नगर : जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर, श्रीगोंदा व कोपरगाव येथील सैनिकांच्या मुला-मुलींच्या वसतिगृहांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, दि. ३० जून २०२६ पर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहिल्यानगर यांनी केले आहे.
हेही वाचा : पुण्यात उद्यापासून १४ दिवस जमावबंदी लागू; मोर्चे-सभांना बंदी, इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय
या सुविधा मिळणार
अहिल्यानगर येथे सैनिक मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह नगर कॉलेजसमोर स्थित असून, श्रीगोंदा येथे शासकीय आरोग्य केंद्राशेजारी सैनिक मुलांचे वसतिगृह कार्यरत आहे. तसेच कोपरगाव येथे खंडोबा मंदिराशेजारी सैनिक मुलांचे वसतिगृह सुरू आहे. या वसतिगृहांमध्ये अंघोळीसाठी गरम पाणी, स्वतंत्र अभ्यासिका, विविध खेळांचे साहित्य तसेच सुसज्ज मैदान उपलब्ध आहे. वेळोवेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करण्यात येते. अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहांच्या अधीक्षकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नक्की पहा : प्रशिक्षणा दरम्यान हॅन्ड ग्रेनेड हातात फुटला; दोन पाेलीस कर्मचारी जखमी
सवलतीच्या दरात प्रवेश (Admission)
या वसतिगृहांमध्ये इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण तसेच औद्योगिक प्रशिक्षण व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिक व सेवेत असलेल्या सैनिकांच्या पाल्यांना सवलतीच्या दरात प्रवेश दिला जाणार आहे. युद्धविधवा तसेच दिव्यांग सैनिकांच्या पाल्यांना विनामूल्य प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी दि. ०१ जुलै २०२६ रोजी प्रवेश निश्चितीसाठी उपस्थित राहावे, असेही कळविण्यात आले आहे.



