Belvandi Police Station : अवैध माती उपसा करणाऱ्यांची महसूल पथकाला अरेरावी; ६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

चालकांकडे उत्खननाचा कोणताही कायदेशीर परवाना मिळून आला नाही

0
Belvandi Police Station : अवैध माती उपसा करणाऱ्यांची महसूल पथकाला अरेरावी; ६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Belvandi Police Station : अवैध माती उपसा करणाऱ्यांची महसूल पथकाला अरेरावी; ६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Belvandi Police Station : श्रीगोंदा : हिंगणी दुमाला व निंबवी परिसरात अवैधरीत्या पोयटा मातीचे उत्खनन (Illegal Excavation of Silt Soil) करणाऱ्या हायवा चालकांनी कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाला धमकी देत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात (Belvandi Police Station) नितीन राऊत (रा. सोनवडी, ता. दौंड), किरण गावडे, एक अनोळखी हायवा चालक या तीन चालकांविरुद्ध ग्राम महसूल अधिकारी आकाश लहू ढोरमले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल (Case Registered) करत ६० लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

नक्की वाचा : पुण्याच्या कुख्यात आंदेकर टोळीतील पाचजण ताब्यात; ४ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुसे जप्त

चालकांकडे उत्खननाचा कोणताही परवाना नाही

श्रीगोंदा तहसीलदार सचिन डोंगरे व प्रशिक्षनार्थी उपजिल्हाधिकारी विनीत शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथक २७ मे रोजी दुपारी निंबवी आणि हिंगणी परिसरात गस्तीवर होते. यावेळी विनापरवाना पोयटा मातीची वाहतूक करणाऱ्या तीन हायवा ट्रक मातीसह पथकाने पकडले. अधिक तपासणी केली असता चालकांकडे उत्खननाचा कोणताही कायदेशीर परवाना मिळून आला नाही.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पथकाशी अत्यंत उद्धट वर्तन (Belvandi Police Station)

महसूल पथकाने वाहने जप्त करून पोलीस ठाण्यात चलण्यास सांगितले असता, चालकांनी पथकाशी अत्यंत उद्धट वर्तन केले. “गाड्या पोलीस ठाण्यात आणणार नाही,” असे म्हणत चालकांनी पथकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि शासकीय कामात अडथळा आणून गाड्या जागेवरच सोडून पळ ठोकला. पथकाने पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला आहे.