Toxic Liquor : पुणे जिल्ह्यातील विषारी दारू प्रकरणामुळे पांगरमलची आठवण ताजी

Toxic Liquor : पुणे जिल्ह्यातील विषारी दारू प्रकरणामुळे पांगरमलची आठवण ताजी

0
Toxic Liquor : पुणे जिल्ह्यातील विषारी दारू प्रकरणामुळे पांगरमलची आठवण ताजी
Toxic Liquor : पुणे जिल्ह्यातील विषारी दारू प्रकरणामुळे पांगरमलची आठवण ताजी

Toxic Liquor : पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू पिल्याने १३ जणांचा मृत्यू (13 Dead Due to Toxic Liquor) झाला आहे. या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पांगरमल बनावट दारुकांडाची (Pangarmal hooch tragedy) आठवण ताजी होत आहे. या दोन्ही घटनांत मोठे साम्य आहे. पांगरमल बनावट दारूकांड (Toxic Liquor) राज्यभर गाजले होते.

दारूमध्ये विषारी रसायन मिसळल्यामुळे दुर्घटना

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसर (पुणे) व फुगेवाडी (पिंपरी-चिंचवड) येथे विषारी दारू प्यायल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. हातभट्टीच्या दारूमध्ये विषारी रसायन मिसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडीत ८ आणि पुण्यातील हडपसर परिसरात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

राज्यभरात गाजली होती घटना (Toxic Liquor)

अशीच एक घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील पांगरमल गावात घडलेल्या दोन वेगवेगळ्या गंभीर घटनांची नोंद स्थानिक इतिहासात आणि गुन्हेगारी नोंदींमध्ये आहे. १३ फेब्रुवारी २०१७ रोजी घडलेली ही घटना राज्यभरात गाजली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत जेऊर गटातील पांंगरमल येथे पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत दारू देण्यात आली. ही दारू बनावट तसेच विषारी दारू होती. ही विषारी दारू प्यायल्यामुळे एकूण १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) तपास करत १९ जणांविरुद्ध न्यायालयात दोन हजार ३९६ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालय परिसरातील एका कॅन्टिनमधून ही विषारी दारू आणल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजले होते. आता पुणे जिल्ह्यात विषारी दारूमुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याने पांगरमल विषारी दारू कांडाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.