MIDC Police Station : बकरी ईदला जेऊर येथे गोवंशीय जनावरांची कत्तल; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

सापळा रचून सुमारे ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0
MIDC Police Station : बकरी ईदला जेऊर येथे गोवंशीय जनावरांची कत्तल; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
MIDC Police Station : बकरी ईदला जेऊर येथे गोवंशीय जनावरांची कत्तल; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

MIDC Police Station : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील एमआयडीसी पोलीस ठाणे (MIDC Police Station) हद्दीतील जेऊर बायजाबाई (Jeur Baijabai) येथे ईद सणाच्या पार्श्वभूमीवर गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यात आली. या ठिकाणी एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकत सुमारे ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी तीन संशयित आरोपींविरुध्द गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : विवेक कोल्हे यांचा गणेश परिसराकडून सत्कार

सापळा रचून सुमारे ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

अजिम शरीफ पठाण, अयसान अजिम पठाण दोघे रा. रा.जेऊर बायजाबाई ता.जि. अहिल्यानगर), व एक अनोळखी व्यक्ती असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार जेऊर येथे गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास मनाई असतानाही त्या ठिकाणी कत्तल होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून सुमारे ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत तीन संशयितांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांच्या पथकाने ही कारवाई केली (MIDC Police Station)

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोलीस अंमलदार सुशांत दिवटे, ज्ञानेश्वर तांदळे, शुभम सुद्रुक, गोरक्षनाथ जावळे, जयसिंग शिंदे, सचिन हरदास यांच्या पथकाने केली आहे.