Jayant Patil on Prajakt Tanpure : ‘प्राजक्त यांचा भाजप प्रवेश आमच्यासाठी धक्कादायक’ – जयंत पाटील

0
Jayant Patil on Prajakt Tanpure : 'प्राजक्त यांचा भाजप प्रवेश आमच्यासाठी धक्कादायक' - जयंत पाटील
Jayant Patil on Prajakt Tanpure : 'प्राजक्त यांचा भाजप प्रवेश आमच्यासाठी धक्कादायक' - जयंत पाटील

नगर: शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure in Bjp) यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. मुंबईतील पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. या सोहळ्यासाठी राहुरी, पाथर्डी व नगर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आता प्राजक्त तनपुरे (Jayant Patil on Prajakt Tanpure) यांच्या भाजप प्रवेशावर तनपुरेंचे मामा जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नक्की वाचा: अहिल्यानगरमधील ‘त्या’ गोळीबार प्रकरणाचा फिर्यादीच निघाला ‘मास्टरमाईंड’ ; प्रकरण काय?

‘प्राजक्त यांचा भाजप प्रवेश आमच्यासाठी धक्कादायक’ (Jayant Patil on Prajakt Tanpure)

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश झाल्याचं मी काही वेळापूर्वी ऐकलं, माझा आणि त्यांचा काही संपर्क झालेला नाही, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे आमच्यासाठी धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. प्राजक्त यांनी त्यांच्या मतदार संघातील परिस्थिती पाहून हा निर्णय घेतलाय असं मला वाटतं, त्यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली की नाही मला माहित नाही, मी त्यांना संपर्क केलेला नाही, असेही जयंत पाटील यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले.

अवश्य वाचा: पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता अधिक का? कारण नेमकं काय?

‘जयंत पाटील आणि शरद पवार यांना भेटायची माझी हिंमत नाही’ (Jayant Patil on Prajakt Tanpure)

प्राजक्त तनपुरे यांनी रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी राहुरीचे नगराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे सख्खे भाचे आहेत. त्यामुळेच, मामा जयंत पाटील आणि शरद पवार यांना देखील भेटायची माझी हिंमत नाही.

मात्र, मी मतदारसंघातील अडचणी लक्षात घेऊन भाजपात जाण्याचा निर्णय घेतोय. ज्यांच्या जीवावर मी हा संघर्ष करत आलोय त्यांच्या भावनांचा देखील मला विचार करावा लागेल. मला माझ्या कार्यकर्त्यांचं राजकारण बघायचं आहे. मला आता शब्द नाहीत, त्यामुळे बोलणं देखील अवघड झालं आहे, असे प्राजक्त तनपुरे यांनी भाजप प्रवेशाची माहिती देताना म्हटले. गेल्या काही दिवसांपासून तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती, अखेर आज त्यांनी कमळ हाती घेत चर्चेला पूर्णविराम दिला आहे.