
Collector : नगर : एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जलस्रोतांचे नियोजन, चाऱ्याची उपलब्धता तसेच संभाव्य पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आतापासूनच सज्ज राहून प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात एल-निनोचा प्रभाव आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
हेही वाचा : LPG महागला, देशभरात आजपासून ५ मोठे बदल! वाचा सविस्तर…
पाणीपुरवठ्याचे नियोजन
डॉ. आशिया म्हणाले, जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात यावे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा देण्यावर भर द्यावा. ग्रामीण व शहरी भागातील पाणीपुरवठा
योजनांची नियमित तपासणी करून त्या सतत कार्यान्वित राहतील, याची दक्षता घ्यावी.
नक्की पहा : सोसाट्याच्या वाऱ्याचा कहर; टर्फ क्रिकेट मैदानाचे मोठे नुकसान
उपाययोजनांबाबत चर्चा (Collector)
बैठकीत कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जलसंपदा विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महावितरण, नगरपरिषद प्रशासन तसेच इतर संबंधित विभागांकडून सद्यस्थितीचा आढावा सादर करण्यात आला. संभाव्य परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, भूजल पातळी, जलस्रोतांची स्थिती, चारा उपलब्धता तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


