
Hunger Strike : पाथर्डी : तालुक्यातील कोळसांगवी येथे कोळसांगवी ते जिरेवाडी रस्ता (Kolsangvi to Jirewadi Road) नाणी नदीवरील पुलासह तातडीने मंजूर करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थ महिलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपोषणाला (Hunger Strike) सुरुवात करण्यात आली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे प्रशासनाचे (Administrative) दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
नक्की वाचा : स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर; सामाजिक बांधिलकीचा दिला संदेश
विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाणे कठीण
कोळसांगवी व जिरेवाडीसह परिसरातील नागरिकांना या रस्त्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात नाणी नदीला पूर आल्यानंतर दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाणे कठीण होते, शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात नेण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतो, तर छोट्या मोठ्या गोष्टी नेण्यात अडथळे निर्माण होतात. अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे हाल होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा जनआंदोलन अधिक तीव्र (Hunger Strike)
यावेळी लोकनियुक्त सरपंच सुरेखा युवराज फुंदे यांनी आपल्या भाषणात प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, कोळसांगवी-जिरेवाडी रस्ता आणि नाणी नदीवरील पुलाचा प्रश्न हा केवळ विकासाचा विषय नसून ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर विद्यार्थ्यांचे शिक्षण खोळंबते, रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचवणे कठीण होते आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटलेला नाही. ग्रामस्थांच्या संयमाचा अंत झाला असून आता रस्ता आणि पुलाच्या कामाला मंजुरी मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
महसूल ग्राम अधिकाऱ्यांची आंदोलकांशी चर्चा
आमरण उपोषणात सुरेखा युवराज फुंदे, खतिजाबी शेख, कमल धनवडे, कमल माळी, गंभिराबाई पेटारे, छबाबाई जाधव, सायरा बाबुलाल शेख, मनिषा साळवे, शोभा पेटारे, शिंधुबाई पेटारे, संगिता कुसळकर, विमल माळी, द्रोपदी साळवे, चंद्रकांला कुसळकर, आशाताई जाधव, आबिदाबी शेख, प्रयागाबाई वाकडे सहभागी झाल्या आहेत. दरम्यान पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता राम राजळे, महसूल ग्राम अधिकारी पुष्प लता बडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली मात्र सायंकाळ पर्यंत कोणताही या आंदोलनावरती तोडगा निघाला नाही.आंदोलकांनी प्रशासनाला इशारा देत कोळसांगवी-जिरेवाडी रस्ता आणि नाणी नदीवरील पुलाचे काम तातडीने मंजूर करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा निर्धार व्यक्त केला.
ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित
यावेळी बशिर शेख, दगडु नाना धनवडे, उपसरपंच रावसाहेब माळी, रवि गाडे, दादासाहेब घुले, कुंडलिक जाधव, आदेश साळवे, गणेश धनवडे, बबन माळी, विजय कुसळकर, चांगदेव कुसळकर, रोहित घुले, रोहीदास पेटारे, शहानवाज शेख, सुनील पेटारे, धोंडीराम धनवडे, वासुदेव फुंदे, गौतम वाघ, भाऊसाहेब माळी, रियाज शेख, नदीम शेख, जगन्नाथ धनवडे, पांडुरंग जाधव, राजु शेख, रवि पेटारे, सचिन गुंजाळ यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


