Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मिळणार एमआयडीसीमध्ये नोकरी

0
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मिळणार एमआयडीसीमध्ये नोकरी
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मिळणार एमआयडीसीमध्ये नोकरी

नगर : राज्यात मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) नोकरी देण्याचा (Jobs in MIDC for the Heirs of Deceased Protesters) महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या निर्णयातून झाल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी सांगितले आहे.

नक्की वाचा : आता रस्त्यांचा कायापालट होणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय

मृत आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी (Maratha Reservation)

जरांगे पाटील यांनी आंदोलनात काही मागण्या केल्या होत्या. या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये मृत आंदोलकांच्या वारसदारांना नोकरी देण्याच्या मागणीचाही समावेश होता. या मागणीसंदर्भात आज, मंगळवारी (ता.२) सामान्य प्रशासन विभागाने तातडीने शासन आदेश जारी केला. आता आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

अवश्य वाचा : आनंदवार्ता! मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी येणार?

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताना मंत्री विखे यांनी मृत आंदोलकांच्या वारसदारांना एमआयडीसीमध्ये नोकरी देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल,असं आश्वासन दिले होते. यापूर्वी मृत आंदोलकांच्या वारसदारांना परिवहन महामंडळात समाविष्ट करून घेण्याचे ठरले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

मृत आंदोलकांच्या वारसदारांची होणार पडताळणी (Maratha Reservation)

एमआयडीसीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मृत आंदोलकांच्या पात्र वारसदारांची पडताळणी करून त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अचूक आणि योग्य शहानिशा करून प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे निर्देशही दिल्याचे विखे यांनी सांगितले.