Leopard Captured : श्रीगोंद्यात सहा महिन्यांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद; नागरिकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण

गेल्या सहा महिन्यांपासून या भागात बिबट्याचा वावर

0
Leopard Captured : श्रीगोंद्यात सहा महिन्यांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद; नागरिकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण
Leopard Captured : श्रीगोंद्यात सहा महिन्यांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद; नागरिकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण

Leopard Captured : श्रीगोंदा : शहरालगत असलेल्या औटेवाडी तलाव (Autewadi Lake) (डी.वाय. १२ शेजारी) परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या (Forest Department) पिंजऱ्यात अडकला आहे. मंगळवारी (ता. २) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद (Leopard Captured) झाला असून, सकाळी ५ वाजता स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. बिबट्या पकडला गेल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असले, तरी परिसरात अजूनही बिबट्याची मादी आणि दोन पिल्ले असण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण आहे.

नक्की वाचा : समृध्दी महामार्गावर लुटमार करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेकडून नऊ लाख २८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

गेल्या सहा महिन्यांपासून या भागात बिबट्याचा वावर

मंगळवारी (ता. २) सकाळी ५ वाजता औटेवाडी परिसरातील बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे दिसून आले. नगरसेविका अनिता औटी यांनी तातडीने वनविभागाला याची कल्पना दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचारी यांचे पथक घटनास्थळी पोहोचून बिबट्याला ताब्यात घेतले. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा बिबट्या गेल्या सहा महिन्यांपासून या भागात सतत वावरत होता.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शेळीच्या आमिषामुळे बिबट्या अडकला पिंजऱ्यात (Leopard Captured)

साधारण १५-२० दिवसांपूर्वी त्याने भरदिवसा एका शेतकऱ्याच्या दोन शेळ्या मारल्या होत्या, तर महिनाभरात तब्बल आठ शेळ्यांचा फडशा पाडला होता. वनविभागाने महिनाभरापूर्वी इथे पिंजरा लावला होता, मात्र त्यात भक्ष ठेवले नसल्याने बिबट्या तिथे फिरकत नव्हता हरिभाऊ औटी, सतीश लक्ष्मण औटी, अशोक औटी, दीपक दिलीप औटी, निखिल औटी, आरीफभाई मालजफ्ते आणि बाळू औटी या शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने पिंजऱ्यात शेळी आणून ठेवली. शेळीच्या आमिषामुळे बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

बिबट्याची दोन शेळ्यांवर झडप

एकीकडे बिबट्या पिंजऱ्यात अडकला असतानाच, दुसरीकडे सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कुदळे मळा परिसरात बिबट्याने दुसरा हल्ला केला. एक महिला आपल्या शेळ्या घेऊन घरी परतत असताना, लिंबोणीच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने दोन शेळ्यांवर झडप घालून त्यांना जागीच ठार केले. महिलेने आरडाओरडा केल्यावर लोक गोळा झाले, तेव्हा बिबट्याने तलावाच्या दिशेने पळ काढला.