Jejuri : भंडाऱ्याची सक्ती केल्यास खंडणीचा गुन्हा; जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी पोलिसांचा निर्णय

0
Jejuri : भंडाऱ्याची सक्ती केल्यास खंडणीचा गुन्हा; जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी पोलिसांचा निर्णय
Jejuri : भंडाऱ्याची सक्ती केल्यास खंडणीचा गुन्हा; जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी पोलिसांचा निर्णय

Jejuri : नगर : आता भाविकांसाठी जेजुरी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. जेजुरी गडावर विशिष्ट दुकानातून ‘भंडारा’ खरेदी करण्याची सक्ती कुणालाही करता येणार नाही. तसे केल्यास तो खंडणीचा गुन्हा मानला जाईल, असा इशाराच पोलिसांनी दिला आहे.

हेही वाचा : शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मान्यता; दोन लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ

…तर खंडणीचा गुन्हा

जेजुरीत येणारे भाविक भंडाऱ्याची उधळण करत असतात. मात्र, काही वेळा व्यापाऱ्यांकडून ‘आमच्याकडूनच भंडारा खरेदी करा’ अशी सक्ती केली जाते. त्यामुळे भाविकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागतो. आता याविरोधात पोलिसांनी थेट भूमिका घेतली आहे. जेजुरी गडावर व्यापाऱ्यांनी भाविकांवर भंडाऱ्यासाठी दबाव टाकला किंवा सक्ती केल्यास तो प्रकार खंडणीचा गुन्हा मानला जाईल, असा कडक इशाराच जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिला आहे.

नक्की पहा : श्रीगोंद्यात सहा महिन्यांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद

भाविकांकडून स्वागत (Jejuri)

जेजुरी येथील पार्किंग आणि भंडारा सक्तीवरून होणारे वाद लक्षात घेऊन प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. दरम्यान, भाविकांना त्यांच्या इच्छेनुसार आवडीच्या ठिकाणी भंडारा आणि पूजेचे साहित्य घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांना याबाबत कोणत्याही प्रकारची सक्ती करता येणार नाही, त्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे भाविकांकडून स्वागत होत आहे.