AMC : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत आज (ता. ०३) नालेगाव नेप्ती नाका चौक, अमरधाम भिंतीलगत परिसर तसेच गाडगीळ पटांगण आतील भाजीबाजार परिसरात अवैध व्यवसाय व अनधिकृत शेड हटविण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली.
हेही वाचा : टिकाव डोक्यात घालून मुलाने केला बापाचा खून; श्रीरामपूर तालुक्यात घडली घटना
परिसर मोकळा
या कारवाईदरम्यान अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या शेड्स व संरचना जेसीबी मशीनच्या सहाय्याने हटविण्यात आल्या. परिसरातील अवैध व्यावसायिक साहित्य जप्त करण्यात आले असून सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण दूर करून परिसर मोकळा करण्यात आला. ही मोहीम अतिक्रमण विभाग, प्रभाग समिती क्र. २ आणि कोतवाली पोलीस यांच्या संयुक्त समन्वयातून पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आली. कारवाईदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही पूर्ण केली.
नक्की पहा : बुऱ्हाणनगर रस्ता कचऱ्याच्या विळख्यात; कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी
महापालिकेचा इशारा (AMC)
सार्वजनिक जागांचा गैरवापर रोखणे, नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे आणि शहरातील अवैध व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे या उद्देशाने अशा कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार आहेत, असा इशारा महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.



