Pathardi Police Station : शंकरवाडी येथे गावठी हातभट्टीच्या अड्डयावर छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त

कच्चे रसायन केले जागीच नष्ट

0
Pathardi Police Station : शंकरवाडी येथे गावठी हातभट्टीच्या अड्डयावर छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त
Pathardi Police Station : शंकरवाडी येथे गावठी हातभट्टीच्या अड्डयावर छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त

Pathardi Police Station : पाथर्डी : पोलिसांनी अवैध दारू (Illegal Liquor) निर्मितीविरोधात मोठी कारवाई करत शंकरवाडी येथील गोपाळ वस्ती परिसरातील गावठी हातभट्टी उद्ध्वस्त (Illicit Country Liquor Distillery) केली. या कारवाईत सुमारे एक लाख ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पाथर्डी पोलीस स्टेशन (Pathardi Police Station) हद्दीत मंगळवारी (ता. ३) पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गोपाळ वस्ती, शंकरवाडी (ता. पाथर्डी) येथील शिवारात छापा टाकला. 

नक्की वाचा : अन्न भेसळविरोधी मोहिम; राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई

Pathardi Police Station : शंकरवाडी येथे गावठी हातभट्टीच्या अड्डयावर छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त
Pathardi Police Station : शंकरवाडी येथे गावठी हातभट्टीच्या अड्डयावर छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त

कच्चे रसायन केले जागीच नष्ट

या कारवाई दरम्यान जालिंदर दत्तात्रय लोणारे (वय २२, रा. गोपाळ वस्ती, शंकरवाडी) याच्या ताब्यातील गावठी हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकली. छाप्यामध्ये ७०० लिटर कच्चे रसायन (किंमत ७० हजार रुपये), १५० लिटर तयार गावठी दारू (किंमत ३० हजार रुपये), नवसागराच्या सहा वड्या तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण १ लाख ३४० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी कच्चे रसायन जागीच नष्ट केले असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.याप्रकरणी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांच्या मार्गदर्शनाखाली झाली ही कारवाई (Pathardi Police Station)

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, देवराव ढगे,संदिप कानडे, संदिप कळमकर, भगवान टकले, गोविंद दराडे ,होमगार्ड किसन सदामत, ज्ञानदेव बडे यांनी सहभाग घेतला.