Monsoon : नगर : केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली. पुढील 48 तासांत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा : शंकरवाडी येथे गावठी हातभट्टीच्या अड्डयावर छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त
मान्सूनसाठी अनुकूल स्थिती
पुढील 2-3 दिवसात मोसमी वारे महाराष्ट्रातील काही भाग व्यापू शकतात, अशी भारतीय हवामान विभागाची माहिती आहे. पुढील 2-3 दिवसांत गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, सोबतच तामिळनाडू, कर्नाटक, बंगालचा उपसागराचा काही भाग आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती आहे.
हेही पहा : एसटी महामंडळाने लाटली जमीन; सावेडीतील ‘त्या’ जागेबाबत गंभीर आरोप
तीन दिवस उशिराने दाखल (Monsoon)
मान्सून केरळात 1 जून रोजी दाखल होत असतो, मात्र यंदा तो 3 जून रोजी दाखल झाला आहे. याचदरम्यान, हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. केरळमध्ये मान्सून धडकला असून यंदा तीन दिवस उशिराने आला आहे. कोकणात सुद्धा 48 तासांत पाऊस दाखल होईल, अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी माध्यमांना दिली आहे. पुढील 48 तासांत दक्षिण महाराष्ट्र त्यामध्ये कोकण मधला भाग तिथे पावसाचा अंदाज आहे, असं प्रवीण कुमार यांनी सांगितले.



