Farmer : नगर : शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे,असं म्हणत अनेक तरुण शेतीपासून दूर पळत असतात, मात्र श्रीगोंद्यातील एका तरुण उद्योजकाने मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर सर्व जुन्या समजूती बाजूला सारत, एक यशस्वी शेतकरी म्हणून नाव कमावले आहे.
हेही वाचा : धारदार तलवार बाळगून दहशत करणारा संशयित आरोपी कोतवली पोलिसांकडून जेरबंद
कॉर्पोरेट कंपन्यांना पुरवठा
युवा उद्योजक असलेल्या चंद्रकांत औटी या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबाच्या साथीने ‘बहाडोली जांभळाची’ अशी काही शेती केली आहे की, आज त्यांची यशोगाथा ‘कोण म्हणतं शेती परवडत नाही?’ असा प्रश्न विचारत आहे. मध्यस्थांची साखळी मोडीत काढत थेट ऍमेझॉन’सारख्या जागतिक कॉर्पोरेट कंपन्यांना माल विकून त्यांनी शेतीला खऱ्या अर्थाने ‘बिझनेस’ बनवले आहे. त्यांनी लावलेल्या बहाडोली जांभळाच्या बागेने अवघ्या दोन वर्षांची झाडे असतानाच उत्पन्न देण्यास सुरुवात केली.
नक्की पहा : संगमनेर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट; घरांचे पत्रे उडाले
कोटीची उलाढाल (Farmer)
आज त्यांची ही १.५ एकराची बाग ७ वर्षांची झाली असून, त्यात ३०० झाडे उत्तम रितीने बहरली आहेत. सध्या जांभळाला २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो विक्रमी दर मिळत आहे. औटी यांच्या दीड एकरातून होणारी आर्थिक उलाढाल जवळपास कोटीच्या आसपास पोहोचते. औटी यांच्या या बागेतील मशागतीपासून ते फळांची तोडणी आणि पॅकिंगपर्यंतची सर्व कामे कुटुंबातील सदस्य मिळून करतात. यामुळे त्यांचा मजुरीचा खर्च वाचून निव्वळ नफ्यात मोठी वाढ झाली आहे. पारंपारिक शेतीला फाटा देत त्यांनी स्वीकारलेल्या आधुनिक मार्गाची सर्वत्र चर्चा होत आहे.



