Stormy winds : वादळी वाऱ्याचा तडाखा; कडगाव येथे घर कोसळून महिलेचा मृत्यू

0
Stormy winds : वादळी वाऱ्याचा तडाखा; कडगाव येथे घर कोसळून महिलेचा मृत्यू
Stormy winds : वादळी वाऱ्याचा तडाखा; कडगाव येथे घर कोसळून महिलेचा मृत्यू

Stormy winds : पाथर्डी : तालुक्यातील कडगाव येथे शुक्रवारी (ता. ५ जून) रात्री झालेल्या वादळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे घराची पडझड होऊन ७५ वर्षीय एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत कुटुंबातील पाच ते सहा जण जखमी झाले असून घरासह संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा : धारदार तलवार बाळगून दहशत करणारा संशयित आरोपी कोतवली पोलिसांकडून जेरबंद

वीजांचा कडकडाट अन् मुसळधार पाऊस

मिळालेल्या माहितीनुसार, कडगाव येथील शेतकरी विलास किसन शिरसाट यांच्या घरावर रात्री साडेनऊ ते पावणेदहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला. वीजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे घरातील सर्व सदस्य पडवीत झोपले होते. त्याचवेळी अचानक आलेल्या सुसाट वाऱ्याने घरावरील पत्रे उडून गेली. तसेच पत्र्यावरील भिंत कोसळल्याने पडवीत झोपलेल्या कुटुंबीयांवर ढिगारा पडला.

नक्की पहा : जिल्हा हमाल पंचायतची बदनामी थांबवा; अन्यथा आंदोलन : अविनाश घुले

उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू (Stormy winds)

या घटनेत घरावरील पत्र्याचा जबर मार समाबाई विलास शिरसाट यांना लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत विलास शिरसाट, सागर शिरसाट, विराज शिरसाट, अलका शिरसाट यांच्यासह अन्य काही कुटुंबीय जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.