
Embezzlement in the State Tax Department : नगर : राज्य वस्तू व सेवाकर विभागातील एका कर्मचाऱ्याविरुद्ध शासकीय निधीच्या अपहारप्रकरणी (Embezzlement in the State Tax Department) भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3 कोटी ८७ लाख ११ हजारांचा अपहार
या प्रकरणात सुमारे 3 कोटी ८७ लाख ११ हजार ८५९ रुपयांच्या शासकीय रकमेचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत प्रकाश लक्ष्मण चव्हाण (रा. गुलमोहर रोड अहिल्यानगर ), यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पदाच्या गैरवापराचा आरोप (Embezzlement in the State Tax Department)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचारी अहिल्यानगर येथील कार्यालयात कार्यरत असताना सन २०१७ ते २०२२ या कालावधीत आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. संगणकीय प्रणालीवरील अधिकृत संकेतस्थळाचा वापर करून महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायद्याअंतर्गत असलेल्या अनेक चलनांमध्ये आवश्यक दुरुस्ती अर्ज नसताना अनधिकृत फेरफार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या फेरफारांमुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप असून, संबंधित रक्कम अपहार केल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. तसेच एका व्यापाऱ्याने भरलेली कररक्कम अन्य व्यावसायिक खात्यावर वळवून शासनाची फसवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात हेमंत लक्ष्मण गांगे यांच्या फिर्यादीवरून प्रकाश लक्ष्मण चव्हाण (रा. गुलमोहर रोड अहिल्यानगर ), यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


