
Nagar : नगर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, विविध पॅनल्सकडून प्रचाराला वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर समर्थ पॅनलच्या प्रचारार्थ महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी शनिवारी (ता.६) रोजी अहिल्यानगर येथे भेट देत मतदारांशी संवाद साधला.
हेही वाचा : राज्य कर विभागातील कर्मचाऱ्यांने केला पावणेचार कोटींचा अपहार; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पाठिंबा देण्याचे आवाहन
यावेळी प्रकाश धोत्रे, शशिकांत नजान यांनी जिल्ह्यातील चित्रपट, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित मतदारांशी चर्चा करून समर्थ पॅनलच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. निवडणुकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील मतदारांना मतदान करण्यासाठी नाशिक येथे मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. मतदान प्रक्रिया उद्या (ता. ७) पार पडणार असून निकालाकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे. समर्थ पॅनलकडून निर्माता सुनील महाजन, लेखक राज काझी, दिग्दर्शक अजित शिरोळे, दीपक कदम, अभिनेते सुशांत शेलार, तसेच धनाजी यमकर, सुभाष नकाशे, शरद चव्हाण, कला दिग्दर्शक प्रवीण पाटील, वेशभूषा चैत्राली डोंगरे, रवी गावडे, गणेश गारगोटे आणि विकास तोरणे आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
नक्की पहा : कडधान्यातून साकारली शिवराज्याभिषेकाची कलाकृती
प्रचारसभांचे आयोजन (Nagar)
मराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या संस्थेची ही निवडणूक असल्याने राज्यभरातील सदस्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विविध पॅनल्सकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारसभांचे आयोजन करण्यात येत असून, मतदानाच्या पूर्वसंध्येला प्रचाराला चांगलाच रंग चढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावेळी रवींद्र सातपुते यांच्यासह अनेक कलावंतांनी मनोगत व्यक्त केले.


