Districts with the most MLAs in the state : राज्यात सर्वाधिक आमदारांचा जिल्हा, तरुण आमदारांचा जिल्हा

Districts with the most MLAs in the state : राज्यात सर्वाधिक आमदारांचा जिल्हा, तरुण आमदारांचा जिल्हा

0
Districts with the most MLAs in the state : राज्यात सर्वाधिक आमदारांचा जिल्हा, तरुण आमदारांचा जिल्हा
Districts with the most MLAs in the state : राज्यात सर्वाधिक आमदारांचा जिल्हा, तरुण आमदारांचा जिल्हा

अहिल्यानगरची राज्यात नवी ओळख

Districts with the most MLAs in the state : नगर : राजकीय (Political) घडामोडींसाठी सतत चर्चेत असणारा अहिल्यानगर जिल्हा आता राज्याच्या विधिमंडळात सर्वाधिक प्रतिनिधीत्व मिळविणारा जिल्हा ठरला आहे. विधानसभा (Legislative Assembly) आणि विधान परिषदचे असून मिळून तब्बल 19 आमदार (MLA) नगरचे आहेत. विधान सभेचे 12 आणि विधान परिषदेचे 7 आमदार आहेत. अर्थात यात सध्या बाहेर असलेल्या पण मूळ नगरच्या आमदारांचा सामावेश आहे. आता अहिल्यानगर जिल्हा राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा (Districts with the most MLAs in the state) झाला आहे. 19 पैकी सर्वाधिक 9 आमदार भाजपचे आहेत.

तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीनंतर संख्या वाढली

राहुरीचे भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची विधान परिषदेवर नुकतीच बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आता ही संख्या वाढली आहे. या आधी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (कर्जत-जामखेड) यांच्यासह अमित गोरखे (मूळचे लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा), सुनील कर्जतकर (मूळचे नान्नज, ता. जामखेड) व विवेक कोल्हे (कोपरगाव) असे चार आमदार भाजपकडून विधान परिषदेवर गेलेले आहेत. तसेच शिवाजीराव गर्जे (मूळचे पाथर्डी) राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून व नाशिक पदवीधर मतदार संघातून सत्यजित तांबे (अपक्ष) असे सहा आमदार यापूर्वीच होते. त्यात तनपुरे सातवे झाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

हे आहेत विधान सभेचे आमदार (Districts with the most MLAs in the state)

तर विधान सभेवर राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), मोनिका राजळे (शेवगाव-पाथर्डी), विक्रमसिंह पाचपुते (श्रीगोंदे) व अक्षय कर्डिले (राहुरी) असे भाजपचे चार आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉ. किरण लहामटे (अकोले), आशुतोष काळे (कोपरगाव), काशिनाथ दाते (पारनेर) व संग्राम जगताप (अहिल्यानगर शहर) असे चार आमदार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे विठ्ठल लंघे (नेवासे) व अमोल खताळ (संगमनेर) हे दोन आमदार आहेत. याशिवाय काँग्रेसचे हेमंत ओगले (श्रीरामपूर) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार (कर्जत-जामखेड) असे 12 आमदार आहेत.

विशेष म्हणजे या आमदारांमध्ये तरुण आमदारांची संख्या जास्त आहे. एकीकाळी दिग्गज नेत्यांचा जिल्हा आता तरुण आणि सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जाणार आहे. जुन्या नेत्यांमुळे नगरचा राज्याच्या राजकारणात दबदबा होता. ती ओळख कायम राखण्याचे आव्हान नव्या तरुण आमदारांवरपुढे आहे.