Akole : निळवंडे येथे अवैध दारूविक्रीचा प्रकार उघड; संबंधितांवर कारवाईचे आमदार डॉ. लहामटे यांचे आदेश

0
Akole : निळवंडे येथे अवैध दारूविक्रीचा प्रकार उघड; संबंधितांवर कारवाईचे आमदार डॉ. लहामटे यांचे आदेश
Akole : निळवंडे येथे अवैध दारूविक्रीचा प्रकार उघड; संबंधितांवर कारवाईचे आमदार डॉ. लहामटे यांचे आदेश

Akole : अकोले : अकोले विधानसभा मतदारसंघातील एका कार्यक्रमानिमित्त आमदार डॉ. किरण लहामटे हे निळवंडे मार्गे सांगवीकडे जात असताना निळवंडे येथे संशयास्पद गर्दी दिसून आली. याबाबत त्यांनी चौकशी केली असता काही युवकांनी तेथून पळ काढल्याचे समोर आले. पुढील माहिती घेतल्यानंतर मेहेंदुरी येथील ग्रामपंचायत कर्मचारी हा अवैध दारू विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला.

हेही पहा : कडधान्यातून साकारली शिवराज्याभिषेकाची कलाकृती

कार्यवाही करण्याच्या सूचना

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आमदार लहामटे यांनी संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच ज्या घरातून हा प्रकार सुरू असल्याचे आढळून आले, त्या संबंधितांबाबत उपलब्ध शासकीय नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अवैध धंदे करणाऱ्यांनी सावध व्हावे, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसून बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नक्की वाचा : वादळी वाऱ्याचा तडाखा; कडगाव येथे घर कोसळून महिलेचा मृत्यू

तडीपारी आवश्यक (Akole)

दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींविरुद्ध तडीपारीसह आवश्यक कायदेशीर उपाययोजना करण्यात येतील, असे सांगत अकोले तालुक्यात अवैध धंद्यांना कोणताही थारा दिला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दारू विक्री, साठवणूक किंवा अशा व्यवसायांना संरक्षण देणाऱ्या व्यक्तींवरही प्रशासनाचे लक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.