Bhushan Deshmukh : नगर : येथील ज्येष्ठ पत्रकार (Journalist) व इतिहास अभ्यासक भूषण गोपाळ देशमुख (Bhushan Deshmukh) (वय ६३) यांचे आज (ता. ६) निधन झाले. त्यांच्या निधनाने नगरचा सांस्कृतिक (Cultural) व ऐतिहासिक कोष हरपला आहे. त्यांच्या मागे ९० वर्षांची आई श्रीमती कुमुदिनी गोपाळ देशमुख, पत्नी ज्योती भूषण देशमुख, मुलगा मोहित भूषण देशमुख, सून ऋतुजा मोहित देशमुख तसेच दोन बहिणी संगीता विळदकर (नाशिक) व सुलभा चिंचोरे (पुणे) असा परिवार आहे. नगरमधील स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी त्यांचे ते मावस भाऊ होते.
नक्की वाचा : तंबूत शिरून मौल्यवान वस्तूंची चोरी; सकाळी उठताच पर्यटकांच्या ‘डोळ्यासमोर काजवे’

किल्ल्याची ऐतिहासिक माहिती देत असताना देशमुख यांना सर्पदंश
एप्रिल महिन्यात भुईकोट किल्ला परिसरात लष्करी अधिकाऱयांच्या पर्यटक गटाला किल्ल्याची ऐतिहासिक माहिती देत असताना देशमुख यांना सर्पदंश झाला होता. त्यावर उपचारानंतर त्यांच्यात प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

इतिहास अभ्यासाची ही गोडी बनली त्यांचे जीवनध्येय (Bhushan Deshmukh)
मूळचे जामखेड देशमुख यांनी टेक्सटाईल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. एका कापड कंपनीत त्यांनी काहीकाळ नोकरीही केली. त्यानंतर ती नोकरी सोडून त्यांनी पत्रकारिता सुरू केली. अहिल्यानगरमध्ये विविध वृत्तपत्रांत त्यांनी काम केले. त्यासोबतच शहराच्या व जिल्ह्याच्या इतिहासाच्या अभ्यासाचा त्यांनी अभ्यास सुरू केला. त्यावर लेखन केले, नागरिकांना माहिती देण्याचे उपक्रम सुरू केले. पत्रकारितेतून निवृत्त झाल्यावर इतिहास अभ्यासाची ही गोडी त्यांचे जीवनध्येय बनली. नगरच्या इतिहासाची ओळख करून देणारा हेरिटेज वॉक हा उपक्रम त्यांनी अनेक वर्षे चालविला. जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांवर मुलांच्या व इतिहास प्रेमींच्या सहली नेऊन त्यांना शहराच्या समृद्ध इतिहासाची माहिती ते देत असत. ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास, स्थानिक इतिहासाविषयीची तळमळ आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी त्यांची नाळ जोडलेली होती.



