Athletes’ Hunger Strike | नगर : महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना थेट शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात यावी तसेच राज्यातील गुणवंत खेळाडूंना न्याय मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू (Athletes’ Hunger Strike) मुंबईत आझाद मैदानावर ११ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक महेश इंदापुरे व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अहिल्यानगरची ज्युदोपटू सुरेखा शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होईल.
हे वाचा – इतिहास जगलेला आवलिया भूषण देशमुख
खेळाडू झाले आंदोलक (Athletes’ Hunger Strike)
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव देश-विदेशात गौरवाने उंचावले आहे. मात्र अनेक पुरस्कार विजेते खेळाडू आजही रोजगाराच्या संधींपासून वंचित आहेत. हरियाणा, पंजाब आणि इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना थेट शासकीय नियुक्ती देण्याचे धोरण तातडीने लागू करावे, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.
नक्की वाचा : तंबूत शिरून मौल्यवान वस्तूंची चोरी; सकाळी उठताच पर्यटकांच्या ‘डोळ्यासमोर काजवे’
प्रमुख मागण्या (Athletes’ Hunger Strike)
शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना थेट शासकीय नियुक्ती देण्यात यावी.
महाराष्ट्रासाठी स्वतंत्र, पारदर्शक व प्रभावी क्रीडा धोरण जाहीर करून गुणवंत खेळाडूंना न्याय मिळेल अशी व्यवस्था निर्माण करावी.
विद्यमान ५% क्रीडा आरक्षण वाढवून १०% करण्यात यावे तसेच या आरक्षणाचा लाभ केवळ पात्र व गुणवंत खेळाडूंनाच मिळावा यासाठी कडक कायदेशीर तरतुदी कराव्यात.
क्रीडा क्षेत्रातील गुणवंत खेळाडूंना रोजगार, प्रोत्साहन, आर्थिक सुरक्षा व सन्मानाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.
१० वी व १२ वी CBSE बोर्डला क्रीडा गुण द्यावे
बाल खेळाडूंना “‘युवराज छत्रपती संभाजीराजे पुरस्कार” तात्काळ द्यावा
शिवछत्रपती पुरस्कारार्थीना शासकीय सेवेत थेट नियुक्ती
राष्ट्रीय पदक विजेत्यांना एक लाख रुपये शिष्यवृत्ती
लाडकी बहिणी प्रमाणे ‘लाडकी खेळाडू योजना’ काढावी
खेळाडूंना मुख्यमंत्री क्रीडा मंत्री सहायता निधी सुरू करावासंभाजी नगर क्रीडा संकुलाला “‘युवराज छत्रपती संभाजीराजे’ नाव द्यावे
क्रीडा आरक्षणात ३ स्पर्धा खेळलेल्यांनाच लाभ द्यावा. तसेंच ५% ऐवजी १०% आरक्षण खेळाडूंसाठी करण्यात यावा
सुहास पाटील यांचे निलंबन व कारवाई
सोपान कटके यांची बेकायदेशीर संलग्नता रद्द करावी त्यांची घराणेशाही व हुकूमशाही बंद करावे
शालेय स्पर्धेत पंचांचे मानधन हे अतिशय कमी असते व त्यात सुधारणा करून किमान प्रति दिवस एक हजार रुपये देण्यात यावे



