Yoga Day : जागतिक योग दिनानिमित्त महिलांसाठी योगासन स्पर्धा; योग विद्याधामचा उपक्रम

0
Yoga Day : जागतिक योग दिनानिमित्त महिलांसाठी योगासन स्पर्धा; योग विद्याधामचा उपक्रम
Yoga Day : जागतिक योग दिनानिमित्त महिलांसाठी योगासन स्पर्धा; योग विद्याधामचा उपक्रम

Yoga Day : नगर : जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योग विद्याधाम तर्फे अहिल्यानगर शहरातील महिलांसाठी विशेष योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २० जून २०२६ रोजी कोहिनूर मॉल येथे ही स्पर्धा सकाळी ७:०० ते १०:०० वाजेदरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी श्रीपाद टॉय वर्ल्ड हे गिफ्टिंग पार्टनर असून ‘आय लव्ह नगर’ सोशल मीडिया पार्टनर असणार आहे.

हेही वाचा : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; कृषिमंत्र्यांचे आवाहन

आकर्षक बक्षिसे

स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच इतर गुणवान सहभागींसाठी तीन उत्तेजनार्थ बक्षिसे आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक महिला भगिनीला आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे.

नक्की पहा : दत्तात्रय पानसरे यांनी माघार घेऊन काय मिळविले?

जाणून घ्या नियम… (Yoga Day)

स्पर्धा निष्पक्ष आणि सुरळीत व्हावी यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. स्पर्धकांचा पोशाख योगासनाला साजेसा, आरामदायक आणि साधा असावा. स्टेजवर दागिने, अंगठी, घड्याळ इत्यादी घालण्यास सक्त मनाई आहे आणि मोबाईल फोन व किमती वस्तूंची जबाबदारी पूर्णपणे स्पर्धकांची राहील. स्पर्धक महिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे फिट असणे आवश्यक आहे. स्पर्धेदरम्यान कोणतीही शारीरिक दुखापत किंवा वैद्यकीय अडचण उद्भवल्यास त्याची पूर्ण जबाबदारी स्पर्धकांची राहील. जागा मर्यादित असल्याने इच्छुक महिलांनी 9130514793 व 9423962940 या क्रमांकावर संपर्क करून तात्काळ नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.