नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar News) महापालिका (Ahilyanagar Corporation) निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आणि भाजपची मनपावर सत्ता आली, पदांच वाटपही झाले, मात्र अजूनही अहिल्यानगर मनपातील विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा कायम आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? सविस्तर पहा…
नक्की वाचा : मान्सून संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? हवामान विभागाने तारीख सांगितली
बाळासाहेब बोराटे यांच्या नावाची शिफारस (Ahilyanagar News)
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे २७, भाजपचे २५ तर शिंदेसेनेचे १० नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादी आणि भाजपच्या सत्ता स्थापनेनंतर शिंदेसेनेने विरोधी पक्षनेता पदावर दावा सांगितला आहे. मात्र महापौर ज्योती गाडे यांनी विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती केलेली नाही. शिंदे सेनेचे बाळासाहेब बोराटे यांच्या नावाची शिफारस होऊनही निर्णय रखडल्याने सत्ताधारी नेमका कोणता राजकीय डाव आखत आहेत, याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
अवश्य वाचा : भारतीय नागरिक Reels वर नेमकं काय पाहतात? मेटाने केला मोठा खुलासा
विरोधी पक्षनेत्याची प्रतीक्षा का?
१६ जानेवारीला महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. २ फेब्रुवारीला महापौर, उपमहापौरांची निवड झाली, २७ फेब्रुवारी ला स्वीकृत सदस्य तसेच स्थायी आणि महिला बालकल्याण समितीचे सदस्य निवडले गेले, तर १० मार्च रोजी स्थायी आणि महिला बालकल्याण समिती सभापतींची निवड प्रक्रिया पार पडली. आता सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेत्याचीच निवड बाकी आहे. सभागृह नेता हा सत्ताधारी नगरसेवकांमधून निवडला जातो, तर विरोधी पक्षनेता विरोधी नगरसेवकांमधून निवडला जातो. या निवडीचे महापौरांना अधिकार आहेत. मात्र महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेला राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने आणि भाजपने विरोधी पक्षनेता पदासाठी झुलवत ठेवल्याने राजकीय चर्चाना उधाण आलंय.
अपवादात्मक परिस्थितीत सत्ताधारी गटातील नगरसेवकही विरोधी पक्ष नेता म्हणून नियुक्त केला जातो. तसे उदाहरण पूर्वी घडलेले आहे. एकूण महापौर म्हणजेच सत्ताधारी ठरविणार तसेच होईल, अशी स्थिती आहे. विरोधी पक्ष नेत्याचे अधिकार आणि महत्व लक्षात घेता ही संधी सहजासहजी विरोधकांना मिळू दिली जाईल,असं चित्र तरी सध्या दिसत नाही



