Gelatin Stick Blast : अकोले : मोपेडवरून एक तरुण जात असताना कोल्हार – घोटी राज्य मार्गावरील औरंगपूर – आंबड फाट्यादरम्यान अचानक स्फोट (Gelatin Stick Blast) झाला. उंच हवेत देखील एक स्फोट (Explosion) झाला. स्फोट इतका मोठा होता की बघणारे हादरले. यात मोपेडचे दोन तुकडे झाले. या घटनेत तरुण ५० फूट हवेत फेकला गेला, तो जबर जखमी (Seriously injured) झाला असून त्याला अकोले येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जिलेटीनला बंदी असताना अकोलेत ते आले कसे? (Gelatin Stick Blast)
बुधवारी सकाळी हा स्फोट झाला. मोपेडवरील दिलीप उत्तम ताजणे (वय ३७) हा तरुण जखमी झाला आहे. ताजणे हा आंबड येथे एका डॉक्टरकडे रोजंदरीवर कामाला आहे. त्याचे मूळगाव शिवनेरी परिसरातील पारुंडे (ता. जुन्नर) असून हल्ली तो आंबड येथे राहात आहे. मासेमारीसाठी वापरात येणाऱ्या जिलेटीन कांडीच्या स्फोटात तो जखमी झाल्याचे समजते. जिलेटीनला बंदी असताना अकोलेत ते आले कसे? हा प्रश्न असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर फॉरेन्सिक तपासणी पथक व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास सुरू आहे.



