World Eye Donation Day : जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम व नेत्रदाता कुटुंबीयांचा सन्मान सोहळा उत्साहात

उपक्रम प्रभावी ठरल्याची भावना उपस्थितांनी केली व्यक्त

0
World Eye Donation Day : जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम व नेत्रदाता कुटुंबीयांचा सन्मान सोहळा उत्साहात
World Eye Donation Day : जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम व नेत्रदाता कुटुंबीयांचा सन्मान सोहळा उत्साहात

World Eye Donation Day : राहाता : श्री साईबाबा संस्थान (Shri Saibaba Sansthan) विश्वस्तव्यवस्था संचलित श्री साईनाथ रुग्णालयातील नेत्रपेढीच्या वतीने जागतिक नेत्रदान दिनानिमित्त (World Eye Donation Day) जनजागृती कार्यक्रम व नेत्रदाता कुटुंबीयांचा सन्मान सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या कार्यक्रमाचा उद्देश नेत्रदानाबाबत जनजागृती (Public Awareness) निर्माण करणे तसेच नेत्रदानासाठी पुढाकार घेणाऱ्या कुटुंबीयांचा गौरव करणे हा होता.

नक्की वाचा : लाचखोर महसूल कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; पण ‘मुख्य सुत्रधार’ अजूनही मोकळेच?

नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) होते. प्रमुख उपस्थिती म्हणून वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे, डॉ. अजित पाटील, डॉ. सौदामिनी निघुते, डॉ. अनघा विखे, अधिसेविका नजमा सय्यद यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, नेत्रदात्यांचे नातेवाईक व कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रींचे पूजन करून करण्यात आली.प्रास्ताविकात डॉ. अशोक गावित्रे आय बँक मॅनेजर यांनी नेत्रदानाचे महत्त्व, त्याविषयीचे गैरसमज आणि समाजातील जनजागृतीची आवश्यकता यावर प्रकाश टाकला. यानंतर गेल्या वर्षभरात श्री साईनाथ नेत्रपेढीमध्ये नेत्रदान केलेल्या २६ नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचा मान्यवरांच्या हस्ते श्रीसाईंची शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सन्मानित नेत्रदात्यांमध्ये यांचा समावेश (World Eye Donation Day)

सन्मानित नेत्रदात्यांमध्ये जगदीश रामेश्वर मंत्री (श्रीरामपूर), शांतीलाल कचरदास लोढा (शिर्डी), मदनलाल चंदनवाल भंडारी (निमगाव), इंदुबाई विठ्ठल बनकर (निमगाव खैरी) सविता वैजनाथ मिठकरी (नेवासा), आसाराम शंकर करडे (कोपरगाव) चंद्रभागाबाई बापूराव शिंदे (कोपरगाव), रत्ना प्रकाश कानडे (शिर्डी), माला दीपक धोंगडी (कोपरगाव), देवेंद्र श्रीकिशन बोहरा (श्रीरामपूर), , जागृती बाबासाहेब नरेडे (शिगवे), निर्मिला महेंद्रकुमार सोळंकी (राहाता), राजनी मोगलराव निरभवणे(वृद्धाश्रम, शिर्डी), संचीलाल रामचंद्र बुरड (राहाता), ज्योती प्रमोदकुमार गुप्ता(श्रीरामपूर), आरती आनंद आंबेकर (वृद्धाश्रम, शिर्डी), भास्कर राधाकिसन वाव्हळ(श्रीरामपूर), कल्याण हिरालाल कासलीवाल(श्रीरामपूर), रमेश मोहनलाल शिंगवी (श्रीरामपूर), अभिषेक अरुण कुमार जैन (राहुरी), रमेश बाबुराव कांबळे(श्रीरामपूर), नागेश माणिकराव धोरणवाल (नांदेड)संगीता शरद पवार (कोपरगाव )जिवन पन्नालाल ओस्तवाल (शिर्डी) लव शंकरराव शिंदे (श्रीरामपूर) प्रेमाबाई सुरजमल लोढा (शिर्डी )यांचा समावेश होता.

उपक्रम प्रभावी ठरल्याची भावना उपस्थितांनी केली व्यक्त

यावेळी सन्मानित कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त करत नेत्रदानामुळे इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होत असल्याचे सांगितले.अध्यक्षीय भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी नेत्रदान हे श्रेष्ठ दान असून प्रत्येक नागरिकाने या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच श्री साईबाबा संस्थान रुग्णालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यसेवा आणि नेत्रदान जनजागृती उपक्रमांची माहिती दिली. नेत्रदान केलेल्या कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार मानून त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी, नेत्रदाता कुटुंबीय तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेत्रदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.