Accused arrested : श्रीगोंद्यातील वृद्ध शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने खून; फरार आरोपीला १२ तासांत बेड्या

सापळा रचून आरोपीस अटक

0
Accused arrested : श्रीगोंद्यातील वृद्ध शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने खून; फरार आरोपीला १२ तासांत बेड्या
Accused arrested : श्रीगोंद्यातील वृद्ध शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने खून; फरार आरोपीला १२ तासांत बेड्या

Accused arrested : श्रीगोंदा : शेताच्या बांधावर मुरुम टाकण्याच्या किरकोळ वादातून एका ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली. या प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) अवघ्या १२ तासांच्या आत मढी परिसरातून अटक (Accused arrested) केली आहे. पिसोरेखांड (ता.श्रीगोंदा) येथील पोपटराव रावजी गावडे (वय ७५) यांचा शेताच्या बांधावरून झालेल्या वादातून विलास दादा गावडे (वय ५५, रा. पिसोरेखांड) याने कुऱ्हाडीने वार करून खून केला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : धांदरफळच्या विकासासाठी राजकारण आड येऊ देणार नाही : अमोल खताळ

सापळा रचून आरोपीस अटक

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार प्रभारी अधिकारी हरिष भोये यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान, आरोपी पोलिसांना चकवा देण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील मढी मायंबा परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मढी गड परिसरातून आरोपी विलास गावडे याला शिताफिने ताब्यात घेतले. आरोपीला अधिक तपासासाठी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.  

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांच्या पथकाने केली कारवाई (Accused arrested)

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, अनंत सालगुडे, पुष्कर कडु पोलिस कर्मचारी सचिन भाबड , रिचर्ड गायकवाड , गणेश धोत्रे, फुरकान शेख, शाम जाधव, मनोज साखरे, भगवान थोरात, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, उत्तरेश्वर मोराळे, चंद्रकांत कुसळक यांनी केली