Sanjay Shirsat : ठाकरे गटाला उशिरा सुचलेले शहाणपण : मंत्री शिरसाट

उपवर्गीकरण हा विषय किचकट करण्याचा प्रयत्न

0
Sanjay Shirsat : ठाकरे गटाला उशिरा सुचलेले शहाणपण : मंत्री शिरसाट गटाला उशिरा सुचलेले शहाणपण : मंत्री शिरसाट
Sanjay Shirsat : ठाकरे गटाला उशिरा सुचलेले शहाणपण : मंत्री शिरसाट

Sanjay Shirsat : नगर : शिवसेना उद्धव ठाकरे गटाने (Shiv Sena) तातडीची उद्या पदाधिकाऱ्यांची जी बैठक बोलावली आहे ते उशिरा सुचलेले शहाणपण आहे, पदाधिकाऱ्यांची संवाद असावा आमदारांची संवाद असावा जे लोकप्रतिनिधी असतील त्यांचे संवाद असावा याबद्दल काही दुमत नाही. पण त्यांना वेळ पण नाही, इंडिया आघाडीची (INDIA Alliance) बैठक झाली ते व्हीसी वरून बोलतात एवढं काय ते बिझी आहेत त्यांच्यामागे नेमकं काय काम आहेत. नेमके कोणत्या कामात बिझी आहेत असा प्रश्न मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उपस्थित केला आहे.

नक्की वाचा : श्रीगोंद्यातील वृद्ध शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने खून; फरार आरोपीला १२ तासांत बेड्या

ऑपरेशन टायगर करण्याची सुद्धा गरज राहिली नाही

पक्षाचे जिवंत ठेवायचा असेल तर तुम्ही कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत अटॅचमेंट असली पाहिजे. आज अनेक आमदार खासदार हे पक्ष सोडत आहे. हे ज्यावेळेस त्यांना कळलं त्यावेळेला ते आता बैठक बोलवायला लागलेले आहेत. पण आता बस झालं, असे आता पदाधिकारी बोलू लागलेले आहेत. त्यामुळे आता या बैठकीचा त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही, असे मंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितले. तसेच शिरसाट म्हणाले की आता ऑपरेशन टायगर करण्याची सुद्धा गरज राहिली नाही कारण स्वतःहून ते पक्ष सोडत आहे असा टोलाही त्यांनी लगावला. संजय शिरसाट हे अहिल्यानगर येथे आले असता शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी बोलत होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शिरसाट म्हणाले की (Sanjay Shirsat)

संजय शिरसाट म्हणाले की, पवार शरद पवारांचं काही नवीन नाही . ज्यावेळेस ते ते एस काँग्रेसमध्ये होते तेव्हा सतेसाठी ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले, आता त्यांनी राष्ट्रवादी काढली आता ते पुन्हा काँग्रेसकडे येत आहे, यापुढे आता त्यांना विलीन होण्याशिवाय पर्याय नाही, कारण ते सत्ते शिवाय राहू शकत नाही असा आरोप मंत्री शिरसाट यांनी केला. उद्या जरी मुस्लिम लीगची सत्ता आली तरी यांना सत्ता पाहिजे आहे असा घणाघात सुद्धा त्यांनी यावेळी केला. त्यामुळे यांना विलनी करणा शिवाय पर्याय नाही असे ते म्हनाले.

रोहित पवारांचे वजन सुद्धा कमी होईल

आमदार रोहित पवार हे शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसले यावर विचारले असता मंत्री शिरसाठ म्हणाले की, या उपोषणाच्या मानाने रोहित पवारांचे वजन सुद्धा कमी होईल, आणि शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या त्यांना कळतील. शेतकऱ्यांच्या भावना अशा तशा नाही त्या मी बघतोय त्यांचे अश्रू आम्हाला माहिती आहे. काय काय त्यांच्या ताटात वाढले आहे, त्याचा दुष्परिणाम आता भोगाव लागत आहे, पण उपोषणा नाटक करणाऱ्यांना शेतकरी कधीच थारा देणार नाही असेही ते म्हणाले.

उपवर्गीकरण हा विषय किचकट करण्याचा प्रयत्न

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये लॉन्ग मार्च काढलेला आलेला आहे, या संदर्भात विचारले असता मंत्री शिरसाठ म्हणाले की, लोकशाहीमध्ये सर्वांना मतं मांडण्याचा अधिकार आहे. उपवर्गीकरण हा विषय काही लोक किचकट करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी पण मी सांगितलं होतं की उपवर्गीकरण होणार नाही. मागील वेळेला जी बिदर समिती आली होती, त्यांनी जो अहवाल दिलेला आहे. तो सरकारने मंजूर केलेला नाही. मी दोन वेळेला सरकारकडे या संदर्भात गेलो होतो. याबाबत वेळ मागून घेतला. आता एक लाख जणांनी हरकती घेतलेल्या आहेत. आता त्यांनी जी हरकत घेतलेली आहे. त्या लोकांचे मत ऐकून घेणे व त्याच्यावर निवाडा करणे हे सर्व काही कॅबिनेट ठरवणार आहे. त्यामुळे आता एक दीड महिन्यामध्ये काम संपणार नाही, याला थोडा वेळ लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.