
Sujay Vikhe Patil : नगर : माझी कोणाशीही शत्रुता नाही. ना कोणता आमदार माझा शत्रू (Enemy) आहे, ना कोणता खासदार. मात्र समाजासाठी घातक वाटणाऱ्या आणि अहिल्यानगरचा (Ahilyanagar) सुसंस्कृतपणा संपवणाऱ्या विचारांना उखडून फेकण्याचे काम मी आयुष्यभर करत राहणार अशा शब्दांत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
नक्की वाचा : एससी/एसटी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरुद्ध बीड ते मंत्रालय ‘लाँग मार्च’; सुपा येथे होणार सत्यशोधक प्रबोधन संमेलन
नाव न घेता खासदार लंके यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा
अहिल्यानगर जिल्ह्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाला धोका निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींचा उल्लेख करताना विखे म्हणाले की ज्या व्यक्तीमुळे माता-भगिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल, अशा विचारांना आणि अशा पुढाऱ्यांना रोखण्यासाठीच कदाचित माझा जन्म झाला असावा. मला पुन्हा निवडणूक लढवता आली नाही तरी चालेल; पण अशा विचारांचा पराभव केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. विखे यांनी नाव न घेता खासदार निलेश लंके यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीनंतर केलेल्या काही वक्तव्यांचा संदर्भ देत त्यांनी म्हटले की, तुम्ही निवडून दिलेल्या खासदारांचे भाषण ऐकले असेल.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
माझा संघर्ष सुरू आहे आणि तो यापुढेही सुरू राहणार (Dr. Sujay Vikhe Patil)
त्यांनी जाहीरपणे सांगितले की जिल्हाधिकारी आणि एसपी माझ्या घरी येऊन सलाम ठोकतील. तर एका आमदाराने मला गृहमंत्री करा, मग एकेकाकडे पाहतो, अशी भाषा वापरली. अशा प्रकारची दर्पोक्ती करणाऱ्यांना सांगू इच्छितो की, हे कुठेच पोहोचणार नाहीत. जिथे मी आहे तिथे मला लाल दिव्याचे नशीब नाही आणि ज्यांच्याकडे आहे तेही टिकणार नाही. कारण आता कोणालाही वाचवले जाणार नाही असा इशाराही विखे यांनी दिला. आपला संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून समाजविघातक प्रवृत्तींविरोधात असल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले, अवैध तस्करी, मटका, जुगार आणि गुन्हेगारीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. या प्रवृत्ती थांबवणे गरजेचे आहे. त्यामुळेच माझा संघर्ष सुरू आहे आणि तो यापुढेही सुरू राहणार आहे.


