Rohit Pawar : रोहित पवारांच अन्नत्याग आंदोलन तात्पूरतं स्थगित; गिरीश महाजन यांची शिष्टाई

0
Rohit Pawar : रोहित पवारांच अन्नत्याग आंदोलन तात्पूरतं स्थगित; गिरीश महाजन यांची शिष्टाई
Rohit Pawar : रोहित पवारांच अन्नत्याग आंदोलन तात्पूरतं स्थगित; गिरीश महाजन यांची शिष्टाई

Rohit Pawar : नगर : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे मागच्या तीन दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन आज अखेर त्यांनी तात्पुरतं मागे घेतलं आहे.

हेही वाचा : सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका लवकरच सुरु होणार; अमोल कोल्हेंकडून मोठी घोषणा

अर्धा तास चर्चा

भाजपचे मंत्री आणि संकटमोचक गिरीष महाजन यांनी रविवारी (ता. १४) रात्री उशिरा आंदोलन स्थळी रोहित पवारांची भेट घेतली. या बैठकीत जवळपास अर्धातास त्यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर रोहित पवारांनी आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं.

नक्की पहा : कोपरगाव शहरात घरफोडी; रोख रकमेसह दागिने लंपास

मागण्यांबाबत बैठक (Rohit Pawar)

गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांच्या भेटीवेळी म्हणाले की, ‘राज्य सरकार सकारात्मक आहे. मोदी असतील किंवा फडणवीस असतील सर्व सकारात्मक आहे. वारंवार शेतकऱ्यांना कर्जमाफी का द्यावी लागते. तर शेतकरी अडचणीत असतो. त्यामुळे त्यांना कर्जमाफी देत असतो. शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्नही आपण सोडवत आहोत. रोहित पवार यांच्या मागण्यांबाबत बैठक बोलावली आहे. चर्चेतून तोडगा निघेल. मी रोहित पवार यांना विनंती करतो की त्यांनी आंदोलन मागे घ्यावं’.