Murder of a Young Man : अहिल्यानगर येथील कवडे मळा परिसरात युवकाचा खून

Murder of a Young Man : अहिल्यानगर येथील कवडे मळा परिसरात युवकाचा खून

0
Murder of a Young Man : अहिल्यानगर येथील कवडे मळा परिसरात युवकाचा खून
Murder of a Young Man : अहिल्यानगर येथील कवडे मळा परिसरात युवकाचा खून

Murder of a Young Man : नगर : अहिल्यानगर शहराजवळील नगर-कल्याण रस्त्यावर (Nagar-Kalyan Road) असलेल्या कवडे मळा परिसरात एका युवकाचा खून (Murder of a Young Man) झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीआहे.

पोलिसांनी पाहणी करून तपास केला सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलीस ठाण्याच्या (Kotwali Police Station) हद्दीतील कवडे मळा परिसरात आज पहाटे सुमारे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास युवकाचा खून झाल्याची माहिती समोर आली. घटनेची खबर मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून प्राथमिक तपास सुरू केला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विविध बाजूंनी तपास सुरू (Murder of a Young Man)

दरम्यान, खून नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास सुरू असून संशयित आरोपीचा शोध घेतला जात आहे.


घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास पथकाला आवश्यक सूचना दिल्या असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.