Corporator Kumarsinh Wakale : नागापुर पुल ते आंबेडकर चौकापर्यंतचे ड्रेनेज लाईनचे काम आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनातून व नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातुन लागले मार्गी

0

Corporator Kumarsinh Wakale : नगर : बोल्हेगाव नागापुर प्रभाग 8 या मध्ये नागापुर मोठा पुल ते आंबेडकर चौकापर्यन्त ड्रेनेज लाईनचे काम प्रगतिपथावर आहे. या भागातिल नागरीकांनी नागापूर मोठा पुल ते गणेश चौक ते आंबेडकर नगर च्या मुख्य आऊलेटची मागणी केली होती. या परिसरातील नागरीकांच्या मागणीचा महानगरपालिकेत सातत्याने पाठपुरावा करून मुख्य ड्रेनेज लाईनचे काम आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांच्या मार्गदर्शनातून व नगरसेवक कुमारसिंह वाकळे (Corporator Kumarsinh Wakale) यांच्या प्रयत्नातून मार्गी लागले आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर येथील कवडे मळा परिसरात युवकाचा खून

पावसाळ्यात नागरिकांच्या घरात शिरायचे पाणी

येथे पुर्वीची ड्रेनेज लाईन ही कमी व्यासाची होती. गणेश चौक परीसरात पावसाळ्यात पावसाचे पाणि हे नागरीकांच्या घरांमध्ये, व्यवसायिक दुकानांमध्ये शिरून खुप मोठया प्रमाणात आर्थिक नुसकान होत होते. यामुळे येथिल नागरिक अत्यंत त्रस्त होते. गणेश चौक, नम्रता हॉटेल परीसर, गणेश पार्क, या परीसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते, यामुळे शाळेतील विद्यार्थी, व्यवसायीक, एम आय डी सी मधिल कामगार वर्ग, भाजीविक्रेते, शेतकरी यांना रहदारी करताना कायम अडथळा निर्मान होत होता.

Corporator Kumarsinh Wakale : नागापुर पुल ते आंबेडकर चौकापर्यंतचे ड्रेनेज लाईनचे काम आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनातून व नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातुन लागले मार्गी
Corporator Kumarsinh Wakale : नागापुर पुल ते आंबेडकर चौकापर्यंतचे ड्रेनेज लाईनचे काम आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनातून व नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातुन लागले मार्गी

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

येथील नागरीकांना मिळणार दिलासा (Corporator Kumarsinh Wakale)

या रोडवर शाळा, कॉलेज, रहिवाशी वस्त्या, मेडीकल, दुकानदार, छोटे-मोठे व्यावसासिक इ. याच रस्त्यावर आहेत. येथील नागरिक व व्यावसायिक ड्रेनेज मुळे त्रस्त होते. या ड्रेनेज लाईनचे काम पुर्ण झाल्यानंतर गणेश चौक, नम्रता हॉटेल परीसर, गणेश पार्क, रूचा रो हौसिंग, शिवकृपा रो हौसिंग, साईविहार व शिवरचना कॉलनी, सोनचाफा कॉलनी, रेणुकानगर महादेव मंदीर परीसर, प्रेमभारती नगर, बालाजी नगर, ओम गृह निर्मान संस्था, आंबेडकर चौक व कातोरे वस्ती, संगम कॉलनी, सागर रो हौसिंग, गणराज रो हौसिंग, साईराज नगर, विजय नगर, साईश्रध्दा कॉलनी, अंकुर कॉलनी, ओंकार कॉलनी, व्यंकटेश कॉलनी इ. भागाची आऊटलेटची समस्या सुटणार आहे. सदयस्थितित नागापुर मोठा पुल ते गणेश चौक ते आंबेडकर चौकापर्यन्त च्या परीसरात पूर्णतः घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. गणेश चौक ते आंबेडकर चौक भागात पुर्णतहा दुर्गधी पसरलेली होती. नागरीकांचे सांडपाणी, ड्रेनेज चे पाणी रोडवरून उघड्यावर ओसंडुन वाहत होते. यामुळे हा परीसर पुर्णतहा दुषित झालेला होता. या मुख्य ड्रेनेज लाईनचे काम पुर्ण झाल्यानंतर नागापुर मोठा पुल ते गणेश चौक ते आंबेडकर चौकापर्यन्तच्या भागाची ड्रेनेज लाईनची समस्या सुटणार आहे.

Corporator Kumarsinh Wakale : नागापुर पुल ते आंबेडकर चौकापर्यंतचे ड्रेनेज लाईनचे काम आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनातून व नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातुन लागले मार्गी
Corporator Kumarsinh Wakale : नागापुर पुल ते आंबेडकर चौकापर्यंतचे ड्रेनेज लाईनचे काम आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनातून व नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातुन लागले मार्गी

हा भाग उपनगराचा भाग असुन येथे नवनविन वसाहती तयार होत आहेत. बोल्हेगाव नागापुर प्रभाग क्रं 8 हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रभाग आहे. या भागामध्ये अत्यंत दाट लोकवसाहत असुन या भागाची लोकसंख्या ही अत्यंत जास्त आहे. वर्ष 2013 पुर्वी बोल्हेगाव, गांधीनगर, नागापुर या भागात विकास कामे झालेलि नव्हती. परंतु, वर्ष 2013 नंतर नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी मुख्य डी आय फेज टु पाईपलाईन, सर्व कॉलन्या अंतर्गत 4″ पाईपलाईन, आरोग्य केंद्र, कॉक्रीटीकरन व डांबरीकरन रस्ते, सभामंडप, मुख्य व अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, रमाई आवास योजना, संजय गांधी व श्रावणबाळ योजना, बालसंगोपन योजना, ओपन जिम, वृक्षारोपन, नविन हायमॅक्स, नविन अंगणवाड्या, सावेडी पासून बोल्हेगाव ते निंबळक रोड, गणेश चौक ते आंबेडकर चौक डांबरीकरन रोड, आंबेडकर चौक ते श्रीराम चौक पासून उभा मारूती मंदीर ते गांधीनगर निंबळ रोड पर्यन्त डांबरीकरन, गणेश चौक ते भाऊ पाटील चौक ते केशव कॉर्नर ते शिवबा चौक ते बोल्होबा चौक बोल्हेगाव गावठान पर्यन्तच्या रोडचे डांबरीकरन तसेच बोल्हेगाव गावठान ते सावेडी सिना नदी पर्यन्त तसेच छत्रपति राजे संभाजीनगर रोडवर व छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आणि अंतर्गत विविध ठिकाणी सौर दिवे बसवुन परीसर प्रकाशमय केला. संपुर्ण गांधीनगर भागात सिमेंटी बंद पाईप ड्रेनेज लाईन, श्रीराम चौक ते उभा मारुती मंदीर ते बोल्हेगाव रोड ते बंग मळ्यापर्यन्त मुख्य सिमेंटी बंद पाईप ड्रेनेज लाईन टाकुन गांधीनगर या भागाची ड्रेनेजच्या आऊटलेटची समस्या सोडवली. तसेच गणेश चौक येथे दिलिप निक्रड मामा गल्ली, विष्णु पोपळे मामा गल्ली, शिवकृपा रो हौसिंग, रूचा रो हौसिंग, जगताप मामा – ज्ञानेश्वर माऊली मंदीरासमोरील रोड काँक्रीटीकरण असे नागरीकांच्या हितासाठी विविध विकास कामे केली आहेत.

2013 पासुन ते आत्तापर्यंत नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी अनेक मोठ मोठी विकास कामे केल्यामुळे बोल्हेगाव नागापुर भागाला शहरीकरणाचा दर्जा प्राप्त होत आहे. येत्या पुढील काळात बोल्हेगाव नागापुर भागाचे शहरीकरणात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वाकळे यांनी व्यक्त केला आहे. या परिसरात अनेक ठिकाणे रस्ते नसल्याने पावसाळ्यात येथील नागरीक अत्यंत त्रस्त होते. या मुख्य ड्रेनेज लाईनचे काम सुरू केले असुन ते प्रगतिपथावर आहे. हे काम पुर्ण झाल्यानंतर नागापुर मोठा पुल ते गणेश चौक ते आंबेकडकर चौकापर्यन्तच्या भागाची मुख्य सांडपाण्याची समस्या सुटणार आहे.