Shirdi Saibaba Donation : शिर्डीतील साईबाबांच्या चरणी गतवर्षीच्या तुलनेत कमी दान, देवस्थानच्या एकूण ठेवी किती?

0
Shirdi Saibaba Donation : शिर्डीतील साईबाबांच्या चरणी गतवर्षीच्या तुलनेत कमी दान, देवस्थानच्या एकूण ठेवी किती?
Shirdi Saibaba Donation : शिर्डीतील साईबाबांच्या चरणी गतवर्षीच्या तुलनेत कमी दान, देवस्थानच्या एकूण ठेवी किती?

नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी (Shirdi) येथील साईबाबा (Saibaba Temple) हे जगप्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे शिर्डीत दरवर्षी लाखो भाविक देश -विदेशातून साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र यंदा साईबाबा ट्रस्टच्या वार्षित उत्पन्नात यावर्षी घट (Saibaba Trust’s annual income drops) झाल्याचे दिसून आलं आहे. साईनगरीत आलेल्या भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दानपेटीत दान टाकलं जातं. आता, संस्थानच्या गतवर्षीच्या वार्षिक उत्पन्नाचा लेखाजोखा समोर आला आहे. २०२४-२५ च्या तुलनेत यंदा काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून आलं आहे.  

नक्की वाचा : पावडर दाखवली, भुरळ घातली आणि सोने घेऊन पळाले;पाथर्डीत नेमकं काय घडलं?

१५ कोटीचे दान वस्तुरूपात (Shirdi Saibaba Donation)

शिर्डीतील साईबाबा संस्थान ट्रस्टच्या  मागील वर्षाच्या तुलनेत संस्थानच्या एकूण उत्पन्नात घट झाली असली, तरी मागील आर्थिक वर्षात पंधरा कोटींचे वस्तुरुपात अतिरिक्त दान प्राप्त झाल्याने दान अधिक असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षात मुदत ठेवींवरील व्याज उत्पन्नात तब्बल १४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

अवश्य वाचा : सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका लवकरच सुरु होणार; अमोल कोल्हेंकडून मोठी घोषणा

वर्षानुसार उत्पन्न किती? (Shirdi Saibaba Donation)

आर्थिक लेखाजोखातील आकडेवारीनुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षात साईबाबा संस्थानचे एकूण उत्पन्न ६४८ कोटी रुपये होते. तर २०२५-२६ मध्ये हे उत्पन्न ६३८ कोटी रुपयांवर आले आहे. म्हणजेच उत्पन्नात सुमारे १० कोटी रुपयांची घट नोंदविण्यात आल्याचे दिसून येते. मात्र, साईबाबा संस्थानला वस्तू स्वरूपात अतिरिक्त दान भक्तांकडून प्राप्त झाल्याची माहिती संस्थानाकडून देण्यात आली. त्यामुळे, वस्तू स्वरूपातील दान ग्राह्य धरल्यास गतवर्षीच्या तुलनेत अधिकच दान झाल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले आहे.

शिर्डी साईबाबांच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूंपैकी सोने-चांदीच्या स्वरूपातील देणगीत मात्र मोठी वाढ झाली आहे. सन २०२४-२५ मध्ये १३ कोटी ९५ लाख रुपयांची देणगी मिळाली होती. ती यंदाच्या म्हणजेच २०२५-२६ मध्ये वाढून १९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

साईबाबा संस्थानचे एकूण उत्पन्न –

सन २०२४-२५ – ६४८  कोटी
सन २०२५-२५ – ६३८ कोटी

सोने-चांदीचे दान  

२०२४-२५ – १३ कोटी ९५ लाख रुपये
२०२५-२६- १९ कोटी

दरम्यान, या व्यतिरिक्त हॉस्पिटल व इतर इमारतीसाठी १५ कोटींचे वस्तुरुपात दान देण्यात आले आहे.