अकोले : पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत फळबाग शेतीत अकोले (Akole News) तालुक्यातील वीरगाव (Veergaon Farmer) येथील शेतकऱ्याने नवा आदर्श निर्माण केला आहे. युवा शेतकरी सुशीलकुमार शांताराम तोरमल (Sushilkumar Tormal) यांनी जांभूळ लागवडीच्या (Jamun Cultivation) माध्यमातून शेतीत एक नवा प्रयोग केला. त्यांनी अवघ्या दीड एकर क्षेत्रात उभारलेल्या जांभूळ बागेने दुसऱ्याच वर्षी भरघोस उत्पादन देत त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरवलाय.
नक्की पहा : वीरगावच्या शेतकऱ्याची दीड एकरातील जांभूळ बागेतून लाखोंची कमाई
२५० झाडातून भरघोस नफा (Akole News)
सुशीलकुमार यांनी कोकणातील प्रसिद्ध बहाडोली वाणाच्या जांभळाची २५० झाडांची लागवड करून फळबाग शेतीचा प्रयोग सुरू केला. योग्य व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आज ही बाग भरघोस उत्पादन देत आहे. या बागेसाठी सुमारे ५० हजार रुपयांचा हंगामी खर्च झाला. मात्र त्याच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न अनेकपटींनी अधिक आहे. सध्या मुंबई बाजारपेठेत जांभळाला प्रतिकिलो सुमारे १८० रुपये दर मिळत असून आत्तापर्यंत ५ टन जांभळाची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे बागेत अजूनही सुमारे ४ टन उत्पादन शिल्लक असल्याने यंदाचा हंगाम त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणार आहे.
अवश्य वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न विचारणारी ‘ती’ नगरची चिमुरडी ‘अहिल्या’!
‘शेती हा तोट्याचा नव्हे तर नफ्याचा व्यवसाय’ (Akole News)
कमी क्षेत्रातही योग्य नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास करून चांगले उत्पन्न मिळवता येते, हे सुशीलकुमार तोरमल यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोग, जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि कष्ट करण्याची जिद्द असेल तर शेती हा तोट्याचा नव्हे तर नफ्याचा व्यवसाय ठरू शकतो, असा सकारात्मक संदेश अकोले तालुक्यातील या शेतकऱ्याच्या यशोगाथेतून मिळत आहे.



