
Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात मुख्यमंत्री पंचायतराज अभियान (Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan) राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध सहभागी गावात विभाग स्तरीय समितीकडून (Divisional-level Committee) पाहणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील तालुक्यातील गावांना या समितीने भेट देत दप्तर तसेच परिसराची पाहणी केली आहे. आज या समितीने अहिल्यानगर तालुक्यातील हिवरे बाजार (Hiware Bazar), मांजरसुंबा गावची पाहणी केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ग्रामस्थ उपस्थित(Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan)
यावेळी पुणे येथील सहाय्यक आयुक्त सुचरिता थोरात, गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित, सहाय्यक गट विकास अधिकारी ज्ञानदेव गुरव, विस्तार अधिकारी महादेव चव्हाण, विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, रामदास दळवी ग्रामपंचायत अधिकारी पिंपळे भाऊसाहेब, सरपंच रूपाली कदम उपसरपंच जालिंदर कदम ग्रामविकास अधिकारी सारिका वाळुंज, कृषी सहाय्यक सुविधा वाणी, ग्रामस्थ इंद्रभान कदम बाळासाहेब कदम चंद्रभान कदम मुख्याध्यापक यशवंत भुतकर, छाया कदमआदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


