NEET : नागपूरच्या विद्यार्थ्याला यूएईतील अबुधाबी केंद्र; NTA च्या कारभारावर प्रश्नचिन्ह

0
NEET : नागपूरच्या विद्यार्थ्याला यूएईतील अबुधाबी केंद्र; NTA च्या कारभारावर प्रश्नचिन्ह
NEET : नागपूरच्या विद्यार्थ्याला यूएईतील अबुधाबी केंद्र; NTA च्या कारभारावर प्रश्नचिन्ह

NEET : नगर : देशभरात उद्या (ता. २१) २२ लाख विद्यार्थी नीटची फेर परीक्षा देणार आहे. यापूर्वी पेपरफुटीमुळे घेतलेली परीक्षा रद्द करावी लागली होती. आता नगापूरमधील अब्दुल्ला मोहम्मद या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी संयुक्त अरब अमिरातमधील अबुधाबी हे परीक्षा केंद्र देण्यात आले. त्यामुळे राष्ट्रीय परीक्षा एजन्सी पालकांचीच परीक्षा घेत निष्काळजीपणाचा कळस गाठत आहे.

हेही वाचा : पद्मसिंह पाटलांची निर्दोष मुक्तता; खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले…

शैक्षणिक वर्तुळात खळबळ

अब्दुल्ला मोहम्मद तालिब असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.जेव्हा अब्दुल्ला मोहम्मद तालिबने नीट यूजी परीक्षेसाठी आपले प्रवेशपत्र डाउनलोड केले, तेव्हा त्यावर थेट देशाबाहेरील परीक्षा केंद्र पाहून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. परीक्षेच्या अगदी पूर्वसंध्येला घडलेल्या या अजब घटनेने शैक्षणिक वर्तुळात सर्वत्र लक्ष वेधून घेतले आहे.

नक्की पहा : गांधी मैदान परिसरात तरुणावर चाकू हल्ला; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सुधारित प्रवेशपत्र (NEET)

हा सर्व प्रकार आणि प्रवेशपत्रातील गंभीर त्रुटी लक्षात आल्यानंतर, राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने तात्काळ आपली चूक मान्य केली आहे. ही समस्या एका तांत्रिक बिघाडामुळे झाली असल्याचे एनटीएने स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर, एनटीएने विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना संपर्क साधून पूर्ण आश्वासन दिले होते की, हे प्रवेशपत्र शक्य तितक्या लवकर दुरुस्त केले जाईल आणि विद्यार्थ्याला नवीन परीक्षा केंद्रासह एक सुधारित प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल. त्यानुसार आता या विद्यार्थ्याला नवीन केंद्र देण्यात आले आहे.