Sanjay Dina Patil : संजय दिना पाटील यांची सत्तेत गेल्यानंतर दोनच दिवसात दमदाटी, पत्रकारांना धमकी देत केली शिवीगाळ

0
Sanjay Dina Patil : संजय दिना पाटील यांची सत्तेत गेल्यानंतर दोनच दिवसात दमदाटी, पत्रकारांना धमकी देत केली शिवीगाळ
Sanjay Dina Patil : संजय दिना पाटील यांची सत्तेत गेल्यानंतर दोनच दिवसात दमदाटी, पत्रकारांना धमकी देत केली शिवीगाळ

नगर : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे सेनेत सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी मुंबईत पत्रकारांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ (Journalists abused in vulgar language)केली. राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांना शिवीगाळ करतानाचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

नक्की वाचा : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टात काय घडलं? आरोपीला फाशी की जन्मठेप?

संजय पाटील पत्रकारांना काय म्हणाले? (Sanjay Dina Patil)

“रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे, कमिशनरकडे जाऊन तक्रार करा. तुमची इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं. मग अजून कशाला गां## घुसताय. अरे कोणत्याही गोष्टीची लिमिट असते. सांगितलं ना सर्व. त्याने काही बोलूदे. तुझ्या आ## ### गेलं, आणि आता माझ्याकडे येऊ नका. माझ्याकडे काही घ्यायला आलात तर मारणार. रेकॉर्ड करा आणि सांगा. तुम्ही आता मला विचारायला आलात तर मार खाणार”, अशा भाषेत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

अवश्य वाचा : केतन अग्रवालला मारण्याचा सियाचा प्लॅन A फसला, पण प्लॅन B सक्सेसफुल,सियाचा प्लॅन C काय होता?

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले ? (Sanjay Dina Patil)

संजय दिना पाटील यांच्या या कृत्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आपली या विषयावर संजय दिना पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. पत्रकारांबाबत त्यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. आपण त्यांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितलं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

“ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रोज संजय दिना पाटील यांच्या विरोधात बोलतात. रोज त्यांच्याबद्दल अपशब्द काढतात. तोडून टाका, मारुन टाका, घरात घुसा आणि अतिशय खालच्या दर्जाच्या नीच दर्जाचे शब्द मीडियासमोर वापरतात. खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे. किती वेळापासून काय-काय बोलतात ते आपण पाहिलेलं आहे. याचा राग संजय दिना पाटील यांच्या मनामध्ये आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“संजय दिना पाटील यांच्या मनात पत्रकारांबाबत कोणताही राग नाही. पत्रकारांच्याबाबत अशा प्रकारचे वक्तव्य आमच्यासारख्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने करुही नये. त्यामुळे मी त्यांना सांगितलं आहे की, आपल्याकडून पत्रकारांचा अपमान करणारे काही शब्द गेले असतील तर आपण पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त केली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.