Ambit Dam : अहिल्यानगर जिल्ह्यातपहिले धरण भरले; मुळा नदीवरील आंबीत धरण ‘ओव्हरफ्लो’

Ambit Dam : अहिल्यानगर जिल्ह्यातपहिले धरण भरले; मुळा नदीवरील आंबीत धरण 'ओव्हरफ्लो'

0
Ambit Dam : अहिल्यानगर जिल्ह्यातपहिले धरण भरले; मुळा नदीवरील आंबीत धरण 'ओव्हरफ्लो'
Ambit Dam : अहिल्यानगर जिल्ह्यातपहिले धरण भरले; मुळा नदीवरील आंबीत धरण 'ओव्हरफ्लो'

Ambit Dam : यावर्षी मान्सून (Monsoon) आणि पाऊस उशिरा आला असला तरी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक समाधानकारक बातमी आहे. जिल्ह्यातील पहिले धरण आता भरले आहे. अकोले तालुक्यातील पश्चिम भागात पाऊस सुरु आहे. हरिश्चंद्रगडाच्या (Harishchandragad) पायथ्याशी उगमस्थान असलेले मुळा नदीवरील आंबीत धरण (Ambit Dam) भरले. त्यामुळे मुळा नदी वाहती झाली. घाटमाथ्यावरील ओढे-नाले वाहू लागले आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पाण्याचा प्रवाह पिंपळगाव खांड धरणाकडे झेपावला (Ambit Dam)

रविवारी (28 जून ) रोजी 193 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आंबित धरणाच्या भिंतीवरून 100 ते 200 क्यूसेक असा विसर्ग मुळा नदी पात्रात झेपावला. हा प्रवाह आता पिंपळगाव खांड धरणाकडे झेपावला आहे. पिंपळगाव खांड धरणाचा पाणीसाठा वाढू लागला आहे. हेच पाणी पुढे मुळा धरणात येणार आहे.तुलनेत पाऊस कमी असला तरी पहिले छोटे धरण भरल्याची सुवार्ता ठरली आहे.